मुंबईमधे खर्चिक बायोटॉयलेट ऐवजी आरसीसीचे टॉयलेट बांधणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 January 2016

मुंबईमधे खर्चिक बायोटॉयलेट ऐवजी आरसीसीचे टॉयलेट बांधणार

मुंबई / अजेयकुमार जाधव 
जेपीएन न्यूज नेटवर्क /  www.jpnnews.in
मुंबईमधे बायोटॉयलेट बनवण्याच्या प्रस्ताव खर्चिक असल्याने आरसीसीची टॉयलेट बनवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली.


मुंबईमधे 5170 बायोटॉयलेट बनवण्यात येणार होते.  तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समिती सादर करण्यात आला होता परंतू ऐन वेळी हां प्रस्ताव सादर झाल्याने नॉट टेकन करण्यात आला होता. सदर प्रस्ताव बुधवारी पुन्हा स्थायी समिती आला असता बायोटॉयलेटसाठी दुप्पट तिप्पट खर्च असल्याने या प्रस्तावाबाबत स्थायी समिती समोर सादरीकरण करावे अशी मागणी सद्स्यानी केली.

मुंबई मधे सध्या असलेल्या टॉयलेटची अवस्था बिकट आहे. कित्तेक टॉयलेटच्या दुरुस्तीची गरज आहे तर काही टॉयलेट नव्याने बनवण्याची मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली. मुंबईमधील टॉयलेटच्या ठिकाणी मलवाहून नेणाऱ्या वाहिन्या नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. टॉयलेट नको अश्या ठिकाणी कित्तेक ठिकाणी टॉयलेट आहेत अशी टॉयलेट बंद करून जेथे खरोखर गरज आहे अश्या ठिकाणी टॉयलेट बनवण्याचा सल्ला विश्वासराव यांनी दिला. मुंबईमधील लोकसंख्या वाढत असल्याने सन 2001 चा लोकसंखेचा आकडा ग्राह्य न धरता 2011 चा लोकसंखेचा आकडा ग्राह्य धरून टॉयलेट बांधावेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. 

यावर बोलताना मुंबईत 117 ठिकाणी उघड्यावर शौच करत असल्याचे सर्व्हे मधून समोर आले आहे. या ठिकाणी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालये उभारण्यात येणार आहेत. अश्या ठिकाणी टॉयलेट उभारण्यासाठी वेगळी अशी परवानगी घ्यावी लागणार नाही. बायोटॉयलेटचा खर्च जास्त असल्याने आरसीसीचे टॉयलेट बनवण्यात येणार आहेत. सीआरझेड अंतर्गत 30 मीटर पर्यंत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे अधिकार दिले आहेत. पालिका कार्यालयाकड़े 2001 चे आकडे असल्याने 2001 च्या लोकसंखेच्या आधारावरच टॉयलेट बनवण्यात येणार असल्याचे दराड़े यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad