अवयव दान मोहिमेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2016

अवयव दान मोहिमेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची मागणी

मुंबई / JPN NEWS.in  मुंबईमध्ये अवयव प्रत्यारोपण्याच्या  प्रतीक्षेत असणाऱ्या  रुग्णाची संख्या  लक्षणीय असूनही तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रत्यारोपणासाठी  अवयव उपलप्ध  होत नाहीत . एकीकडे अवयवदानाच्या प्रचारामुळे समाजातील बऱ्याच  व्यक्ती मरणोत्तर अवयव दानासाठी इच्छुक असतानाही योग्य त्या माहितीअभावी ते शक्य होत नाही , याचा विचार करून पालिका हद्दीतील स्वयंसेवी  संस्थांची मदत घेऊन अवयवदानासाठी  इच्छुक असलेल्या दात्यांची यादी  एकत्रित करून  सदर यादी अवयव दात्यांच्या  व संबंधित संस्थांच्या नाव व पत्त्यांसहित महानगरपालिकेच्या सर्व उपनगरीय  रुग्णालये , प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे प्रदर्शित करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेविका प्रमिला  शिंदे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. 


सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान म्हणजे अवयव दान होय . दिवसेंदिवस वाढत्या प्रचारामुळे मरणोत्तर अवयव दान  करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, मात्र अवयव दान करणाऱ्या आणि अवयव प्रत्यार्पोण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांमध्ये योग्य ती माहिती उप्लाप्ध नसल्याने अनेक रुग्ण अवयव प्रत्यारोपानापासून वंचित न्राहतात , याकरिता मुंबईतील स्वयंसेवी संस्थांची याकामी मदत घेऊन अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण आणि मरणोत्तर अवयव दान करू एचिनर्यनचि यादी तयार करून प्रदर्शित केल्यास दोघानाही त्याचा फायदा होईल , त्यामुळे महापालिकेने यासाठी पुढाकार घ्यावा , अशी सूचना प्रमिला शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad