मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, शुक्रवारी दुपारी ते मुंबईत दाखल होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्यासाठी मालाड येथील फादर जस्टीन मैदानावर दुपारी २ वा. पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि राहुल गांधी यांची भाषणे होतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता राहुल गांधी यांचा ताफा आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात दाखल होईल. येथे दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या सभागृहाचे राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.