मुंबई / JPN NEWS.in : नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर भानावर आलेल्या महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना चाप लावण्यासाठी नालेसफाई बाबत नवीन धोरण तयार केले आहे़, नव्या धोरणानुसार जानेवारीपासून नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात होणार आहे़ ही सफाई वर्षभर सुरू राहणार असून, ठेकेदारांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे़.
मुंबई महानगरपालिकेने सन २०१५ ते २०१७ असे दोन वर्षांसाठी नालेसफाईचे कंत्राट दिले होते़, परंतु कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी बनावट डंपिंग ग्राउंडचे ना हरकत प्रमाणपत्र, काढलेल्या गाळाचा हिशोब न ठेवणे, जीपीएस यंत्रणा कुचकामी ठरणे, गाळ काढल्याचे ऑडीट न करणे अशा अनेक अनियमितता आढळून आल्यानंतर, पालिकेने नालेसफाईचे कंत्राट रद्द केले़ आहे. याप्रकरणाच्या चौकशीत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नवीन धोरण गटनेत्यांच्या बैठकीपुढे ठेवले आहे़ त्यानुसार, यापुढे नालेसफाई चार टप्प्यांमध्ये होणार आहे़ जानेवारी ते मार्च २० टक्के, एप्रिल ते ३१ मे ६० टक्के, जून ते सप्टेंबर २० टक्के आणि आॅक्टोबर ते मार्चपर्यंत पुन्हा २० टक्के गाळ काढणे ठेकेदारांना बंधनकारक असणार आहे़. पावसाळ्यात प्रत्येक नाल्यामधील गाळ दररोज साफ करणे बंधनकारक असणार आहे़.
No comments:
Post a Comment