बेस्ट वाचविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा - नगरसेवकांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2016

बेस्ट वाचविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा - नगरसेवकांची मागणी

बेस्टचा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजूर
मुंबई / प्रतिनिधी / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
मुंबईकरांची लाईफ लाइन म्हणून ओळख असलेल्या  बेस्ट उपक्रमाचा 2016-17 च्या एकूण 6666 कोटी 52 लाख रुपयाच्या आणि एक लाख रुपये शिलकी अर्थसंकल्पाला आज पालिका सभागृहाने मंजूरी दिली त्यामुळे आता बेस्ट अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यास मोकळी झाली आहे मात्र अर्थसंकल्प मंजूर करण्या अगोदर सदस्यांनी बेस्टला कर्जमाफी द्या अशी मागणी आज सर्वपक्षीय सदस्यांनी
पालिका सभागृहात केली. पालिका आणि राज्य सरकारने बेस्ट वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही सदस्यांनी लावून धरली बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ जगदीश पाटील यांनी या मागण्याची दखल घेतली जाईल आणि लेखी र-वरपात कळविण्यात येईल असे आश्‍वासन दिले


बेस्टचे उत्पन्न 6666.52 कोटी आणि 6666.51 कोटी खर्च आहे. त्यामुळे एक लाख रुपये इतका शिलकी अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात मंजूरीसाठी आला होता. गेल्या चार दिवसांपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती.चार दिवसात 232 नगरसेवका पैकी केवळ 28  नगरसेवकानीच फक्त 9.20 तास  भाषण केले आज या अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाली. बेस्टवर आर्थिक संकट ओढवले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी पालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने बेस्टला आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. वाहतूक कोंडी दुरू करावी, रस्ते मोकळे करावेत, फेरीवाल्यांना हटवावे, प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात, खासगी वाहतूक रोखावी, प्रवाशांची संख्या वाढवावी आदी सुचना सदस्यांनी केल्या. 


या मागण्यांची दखल घेवून घेवून काटकसर करू, नियोजन करू आणि बेस्टचा दर्जा सुधारू अशी ग्वाही बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली नगरसेवकांच्या सुचनांची दखल घेवून त्यांची अंमलबजावणी करा असे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले दिलीप पटेल, दिलीप लांडे, अशरफ आझमी, प्रमोद सावंत, राजू पेडणेकर, रमेश कोरगावकर, डॉ. अनुराधा पेडणेकर, संजय पवार, दिपक भुतकर, अनिल निंबकर आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.

Post Bottom Ad