पुढील तीन महीने रेडी रेकनरच्या दरात बदल नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2016

पुढील तीन महीने रेडी रेकनरच्या दरात बदल नाही

मुंबई / JPN NEWS.in / 1 Jan 2016
मुद्रांक शुल्कामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क घेण्यात स्थगिती देण्यात आली आहे.
आयकराच्या परिगणनेसाठी 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी विचारात घेण्यात येतो. तसेच शासनाचे इतर सर्व व्यवहार ही याच कालावधीत होतात. त्यामुळे हा बदल त्याच्याशी सुसंगत होईल. तसेच ही बाब इझ ऑफ डुइंग बिझनेच्या अनुषंगाने आहे. मुद्रांक शुल्कासाठी निश्चित करण्यात येणारे उद्दीष्ट हे आर्थिक वर्षासाठी असल्याने व बाजारमूल्य दर (रेडी रेकनर) तक्ते हे त्याच कालावधीसाठी निर्गमित करण्यात आल्यास ते जास्त‍ सुसंगत व व्यवहार्य होणार आहे.
यामुळे मुंबई मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमुल्य दर) नियम 1995 ला सुधारणा करण्यात आली असून यापुढे बाजारमुल्य दर तक्ते दिनांक 1 जानेवारी ऐवजी 1 एप्रिल रोजी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडून जाहिर करण्यात येतील.

राज्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 3 हजार 578 कोटींचा निधी वितरीत करण्यात येणार असून ही मदत कापूस पीक वगळून जाहिर करण्यात आली आहे. कापसाची अंतिम आणेवारी 15 जानेवारीनंतर जाहिर होताच ज्या कापूस उत्पादकांनी कापूस पिकाचा विमा काढलेला आहे व ज्यांनी काढलेला नाही, अशा कापूस उत्पादकांना मदत देण्यात येईल, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad