मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
हैद्राबाद येथील केंद्रीय महाविद्यालयातील पीएच. डी.करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येचे पडसाद देशभरात उमटत असताना चेंबूरच्या पांजरापोळच्या मुख्य रस्त्यावर काँग्रेस, भीमशक्ती संघटना ,राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात रस्ता रोको करून काही काळ वाहतूक ठप्प केली. ट्रोम्बे पोलिसांनी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे ताब्यात घेवून सुटका केली.
हैद्राबादच्या रोहित विमुल यांच्या आत्महत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळत असून त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी अनेक सामजिक संघटना व राजकीय पक्ष आंदोलने, निदर्शने करत आहेत. त्यातच चेंबूर ,गोवडी,मानखुर्द मधील सिद्धार्थ कॉलनी ,लालडोंगर,पीएल लोखंडे मार्ग, लुबिनीया बाग, गौतम नगर ,पांजरापोळ या भागात दलित समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. रोहित वेमुला यांच्या आत्महत्येची बातमी वाऱ्या सारखी पसरताच या परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी चेंबूर परिसरात निषेध केला आहे.
काँग्रेस, भीमशक्ती संघटना,राष्ट्रवादी काँग्रेसने पनवेल सायन मार्गावरील सकाळी 11वाजता पांजरापोळ फ्रीवे येथे जोरदार निदर्शने केली.भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलितांवर अन्याय अत्याचार वाढत आहे.हा अन्याय आह्मी सहन करणार नाही. रोहित वेमुला या दलित युवकाची आत्महत्या नसून त्याचा तेथील जातीयवादयांनी बळी घेतला आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी,विद्यापीठाचे कुलगुरु अप्पा राव , केंद्रीय मंत्री बंडारू दतात्रेय यांच्यावर ऑ कट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना पदावरून दूर केले पाहिजे.जो पर्यंत त्याला न्याय मिळत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी दिला.
सकाळची वेळ असल्याने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने फ्रिवे तसेच सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, मुंबई प्रदेश चिटणीस कैलास आरवडे, राजेंद्र नगराळे नगरसेवक संगीता हंडोरे, किसन मेस्त्री, नीलम डोळस, सीमा माहुलकर, राष्ट्रवादी पक्षाचे सचिव प्रकाश भोसले,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.