नगरपंचायत निवडणूकीचे निकाल ही सरकारच्या जनहीतविरोधी कारभाराची प्रतिक्रिया-धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2016

नगरपंचायत निवडणूकीचे निकाल ही सरकारच्या जनहीतविरोधी कारभाराची प्रतिक्रिया-धनंजय मुंडे

JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in
मुंबई,  दि 11 -  राज्यातील नगरपंचायत निवडणूकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला दूसरे स्थान मिळाले असून या यशाबद्दल समाधान व्यक्त करतानाच जनतेने सत्ताधारी भाजपा-सेनेला स्पष्टपणे नाकारून राज्यातील जनहीतविरोधी कारभाराबद्दल प्रतिक्रिया दिली असल्याचे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.


राज्यात नव्याने स्थापन झालेल्या 20 नगरपंचायतीच्या निवडणूकीतील 331 जागांपैकी 84 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दूसरा क्रमांक मिळवला आहे. काॅग्रेसला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या आहेत,सत्ताधारी शिवसेना 58 जागांसह तिसर्‍या स्थानावर फेकला गेला असून प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला तर केवळ 32 जागा कशाबशा मिळवता आल्या आहेत व हा पक्ष चौथ्या स्थानावर गेला आहे,

या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करतानाच हे निकाल म्हणजे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने सरकारविरुद्ध व्यक्त केलेला संताप असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे. अनेक मंञ्यांना त्यांच्या मतदारसंघातील नगरपंचायतीही जिंकता आल्या नाहीत याचाच अर्थ जनतेच्या मनात सरकारच्या  कारभाराबद्दल रोष असून त्यांनी तो या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

निवडणूका झालेल्या भागात दूष्काळाची परिस्थिती आहे. सरकार दुष्काळग्रस्तांकडे करत असलेल्या दूर्लक्षाबद्दल जनतेने मतदानाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका-नगरपालिका निवडणूकीत अधिक चांगली कामगिरी बजावेल असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला आहे. जामखेड,शेवगाव, माणगाव, म्हसळासह अनेक प्रमुख नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्याची माहीतीही मुंडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad