सफाई कामगार अनुकंपा भरती घोटाळा आरोपींचा आकडा १५ वर पोहोचला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2016

सफाई कामगार अनुकंपा भरती घोटाळा आरोपींचा आकडा १५ वर पोहोचला

JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in  मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगाराच्या चतुर्थ श्रेणीतील अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींचा आकडा आता १५वर पोहोचला आहे. घोटाळ्यामध्ये बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या मुकेश झाला (५१)सह पालिकेतील लिपिक प्रमोद कासकर (५०) याला गुन्हे शाखेने सोमवारी गजाआड केले. या प्रकरणी पालिकेतील आणखी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

पालिकेत लाखो रुपये घेऊन बोगस पद्धतीने सफाई कामगार भरती होत असल्याचा घोटाळा गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता. या प्रकरणी डी आणि जी दक्षिण वॉर्डमधील तब्बल १३ जणांना अटक केली होती. यातील जी दक्षिण वॉर्डमधील रमेश भिका राठोड (५०)सह अटक करण्यात आलेला आरोपी लिपिक वाघमारे हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले. यातील मास्टरमाइंड असलेल्या आरोपी प्रशील वाघमारेने घोटाळ्यातून उकळलेला पैसा परदेशवारी, कॅसिनो तसेच बारमध्ये उडविल्याची माहिती तपासात समोर आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad