मुंबई / JPN NEWS.in इमारत बांधणीसाठी आवश्यक परवानग्यांची संख्या कमी झाली आहे तसेच फाईल पास करण्यासाठी ६० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गृहबांधणीचे दर कमी होणार आहेत. कमी आणि वेगवान परवानग्यांमुळे इमारत बांधणीचा अंदाजित खर्च ३० टक्क्याने कमी होणार आहे. कमी झालेल्या खर्चाचा २० टक्के सवलतीच्या रुपाने ग्राहकांना फायदा पोहोचवण्याची विकासकाची योजना आहे.
महापालिकेच्या इमारत परवानगी विभागासोबत काम केलेल्या एका वरिष्ठ वास्तूविशारदाने दिलेल्या माहितीनुसार विकासक प्रत्येक स्कवेअर फूट परवानगीसाठी एक हजार रुपये खर्च करायचे, आता परवानग्या कमी झाल्यामुळे प्रत्येक स्कवेअर फुटचा खर्च ७०० ते ८०० रुपये झाला आहे. या कमी झालेल्या खर्चाचा फायदा गृहखरेदीदारांना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment