मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
हैदराबाद विद्यापिठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याचा जातीयवाद्यांनी बळी घेतला याचा तीव्र निषेध करण्यासाठी व आत्महत्येला जबाबदार असलेले कुलगुरू, केंद्रिय मंत्री व अधिकारी यांच्यावर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून पद मुक्त करावे, या मागणीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तर्फे शनिवार दि. ३० जानेवारी, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता, आझाद मैदान येथे ‘‘ एक दिवशीय उपोषण ’’ करण्यात येणार आहे.