दहिसरमधील आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2016

दहिसरमधील आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात

मुंबई / JPN NEWS.in - दहिसरमधील मैदानासाठी आरक्षित भूखंडाच्या हस्तांतर प्रस्तावाला मुंबई महापालिकेने शनिवारी (ता. 2) घाई घाईत मंजुरी दिली. त्यामुळे हा भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या (बिल्डर) घशात गेल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात करण्यात येत आहे.  

दहिसर गावातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेला 853 चौरस मीटरचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी जमीनमालकाने 5 जानेवारी २०१५ ला महापालिकेकडे खरेदी सूचना पाठवली होती. त्यावर वर्षाच्या आत निर्णय होऊन राजपत्रात संबंधित भूखंड ताब्याबाबत जाहीर करणे गरजेचे होते. परंतू महापालिकेच्या सुधार समितीने ही खरेदी सूचना २९ डिसेंबरला मंजूर केली. शनिवारी २ जानेवारीला पालिका सभागृहात मंजुरीसाठी आणण्यात आली. सत्ताधाऱ्याना हा भूखंड बिल्डरच्या घश्यात घालायचा आहे असा आरोप करत विरोधकांनी या ठरावाला विरोध केला परंतु बहुमताच्या जोरावर तो मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर महापौर स्नेहल आंबेकर यांनी विरोधक आणि सात्ताधारी नगरसेवकांना बोलण्याची संधीही न देत प्रस्ताव घाई घाईत मंजूर केला आहे.

खरेदी सूचनेला मंजुरी मिळाल्यानंतर सोमवारपर्यंत या सूचनेला राजपत्रात मंजुरी मिळणे आवश्यक आहे. रविवारी सुटी असल्यामुळे सोमवारी त्यावरील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. बिल्डरला संबंधित भूखंड मिळावा, यासाठी खरेदी सूचना दडवून ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad