मुंबई / प्रतिनिधी / www.jpnnews.in
मुंबई महानगरपालिकेची मैदाने आणि उद्याने देखभालीसाठी कंत्राटदाराना देण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदा रद्द कराव्यात अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने नुकतीच मोकले भूखंड आणि उद्याने दत्तक तत्वावर देण्याचे धोरण मंजूर केले होते. या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. महापालिकेने एकीकडे दत्तक तत्वावर उद्याने भूखंड देण्याचे धोरण आखले असताना दुसरीकडे मात्र महापालिकेने उद्याने मैदाने देखभालीसाठी कंत्राटदाराना देण्याच्या निविदा 15 जानेवारीला उघडल्या आहेत. या निविदा कंत्राटदारानी 62 ते 78 टक्के कमी दराने भरल्या आहेत. कंत्राटदारानी भरलेल्या निविदा रकमेनुसार मैदाने उद्याने देखभालीचे काम 22 रकमेमधे करू शकतात का ? असा प्रश्न आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या मैदाने आणि उद्यानांची इतक्या कमी रकमेत देखभाल योग्य प्रकारे होणार का ?असे प्रश्न आंबेरकर यांनी उपस्थित केले आहेत. कंत्राटदाराने कमी दरात काम केल्यास काम निकृष्ट दर्जाचे होणार असल्याने यामुले पालिकेचे नाव ख़राब होण्याची शक्यता असल्याने या निविदा रद्द करून नव्याने निविदा काढाव्यात अशी मागणी आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे