हैद्राबादच्या दलित िवद्यार्थी आत्महत्या प्रकरणाचे मुंबईत पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 January 2016

हैद्राबादच्या दलित िवद्यार्थी आत्महत्या प्रकरणाचे मुंबईत पडसाद

मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
हैद्राबाद िवद्यापीठातील संशोधक िवद्यार्थी रोहीत येमुला याच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद मुंबईत सोमवारी उमटले. रिपाइंच्या िवद्यार्थी संघटनेने सीएसटीसमोर रास्ता रोखला तर मुंबई िवद्यापीठासमोर िवविध शैक्षणीक संस्थांमधील दोनशेपेक्षा जास्त िवद्यार्थ्यांनी जोरदार िनदर्शने करत अभाविप आिण भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.  

अभाविप आिण आरएसएस प्रणीत िवद्यापीठ प्रशासनाने रोहीतचा बळी घेतल्याचा स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया, डेमोक्रेटीक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आिण जाती अंत संघर्ष समितीने केला आहे. तसेच या संघटनांनी उद्या (मंगळवारी) दादर येथे िनदर्शनाचे आयोजन केले आहे.

येमुलाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाइं अध्यक्ष आिण खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. बुधवारी ते हैद्राबाद िवद्यापीठास भेट देऊन आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (एएसए) निलंबीत केलेल्या  इतर चार िवद्यार्थ्यांच्यी भेट घेणार आहेत. 

येमुला आत्महत्याप्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय, मनुष्यबळ िवकास मंत्री स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा आिण हैद्राबाद िवद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव पोडिले यांना िनलंबीत करावे अशी मागणी भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

आयआयटी, टीस, मुंबई आिण एसएनडीटी िवद्यापीठ, सिद्धार्थ महाविद्यालय यामधील दोनशेपेक्षा अिधक िवद्यार्थ्यांनी कलिना येथील मुंबई िवद्यापीठासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच येमुला याच्यासोबत िनलंबीत करण्यात आलेल्या इतर चौघा िवद्यार्थ्यांना सन्मानाने पुन्हा विद्यापीठात प्रवेश द्यावा अशी मागणी या िवद्यार्थ्यांनी मुंबई िवद्यापीठाच्या कुलगुरुंकडे एका िनवेदनाव्दारे केली आहे. 

भीम यात्रा संकटात 
 िरपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी कन्याकुमारी ते आंबेडकर यांचे जन्मस्थान महू (मध्य प्रदेश)अशी भारत भीम यात्रेचे िनयोजन केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्ताने  २६ जानेवारी ते २४ एप्रिल दरम्यान ही यात्रा काढण्यात येणार आहे. ह्यजाती तोडो, समाज जाडो समता अिभयानह्ण असे यात्रेचे ब्रिद आहे. भाजपच्या वळचणीला जावून खासदारकी िमळवल्याने आंबेडकरी अनुयायांची आठवले यांच्यावर नाराजी आहे. रोहित येमुला याच्या आत्महत्येमुळे भाजप, अभाविप िवरोधात आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष िनर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवले भीम यात्रा काढत असल्याने यात्रेचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

Post Bottom Ad