धर्म म्हणजे पूजाअर्चा नव्हे - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2016

धर्म म्हणजे पूजाअर्चा नव्हे - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

मारुंजी (जि. पुणे) JPN NEWS.in - "धर्म म्हणजे पूजाअर्चा नव्हे. आर्थिक, सामाजिक एकता आल्याशिवाय राजकीय एकतेला अर्थ नाही. फक्त कायदे केल्याने समाज समान होत नाही. विषमता ही मनातून गेली पाहिजे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले. केवळ कायद्याच्या आधारे कुठेही समता आलेली नाही. मनातून विषमता जेथे गेली तेथेच कायदे यशस्वी झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मारुंजी येथील रा. स्व. संघाच्या शिवशक्ती संगम मेळाव्यात ते बोलत होते. सहकार्यवाह भैयाजी जोशी, प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायक थोरात आणि क्षेत्रीय संघचालक जयंती भाडेसिया या वेळी व्यासपीठावर होते. अडीच लाखांहून अधिक श्रोत्यांना डॉ. भागवत यांनी ४५ मिनिटे मार्गदर्शन केले. शक्तीशिवाय सत्याचीही चलती नाही. सत्यशिवाय शक्ती नाही आणि सत्यात भेदाला स्थान नाही, असे सांगून डॉ. भागवत यांनी हिंदूंच्या संघटनावर भर दिला. आजपर्यंत कोणीही स्वत:च्या ताकदीवर भारत जिंकू शकलेला नाही. आपसातील फाटाफुटीमुळेच आपला पराभव झाला. त्यामुळे सर्व समाजांविषयी प्रेमाची भावना हवी. सामाजिक एकतेतूनच देशाची शक्ती वाढते, असे मत भागवत यांनी व्यक्त केले, या मेळाव्याला गणवेशातील एक लाख ६० हजार स्वयंसेवकांसह अडीच लाख लोक उपस्थित होते.

'विषमता, भेदभावाला समाजात थारा असू नये'
निरनिराळ्या भेदांनी पोखरलेला समाज कितीही मोठा असला तरी त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. विषमता, भेदभावाला थारा असता कामा नये. सर्वजण माझे आहेत हे लक्षात आल्यानंतर माणूस धर्माने राहतो. धर्म म्हणजे पूजाअर्चा नव्हे. आर्थिक, सामाजिक एकता आल्याशिवाय राजनैतिक एकतेला अर्थ नाही. सर्व समाजाविषयी प्रेमाची भावना हवी,’ असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू संघटनांवर भर दिला.

पुणे जिल्ह्याती मारुंजी येथील विस्तीर्ण मैदानावर रविवारी अायाेजित ‘शिवशक्ती संगम' मेळाव्यात ते बाेलत हाेते. "सर्वांविषयी कृतज्ञता बाळगण्याची आपली परंपरा आहे. भाषा, प्रांत, जाती, पंथ, पक्ष वेगळे असले तरी सगळ्यांची संस्कृती एकच आहे. जग त्याला हिंदू संस्कृती म्हणून ओळखते. प्रत्येक हिंदू या भूमीला माता मानतो. तिच्या सेवेची इच्छा बाळगतो. परंपरेने चालत आलेली ही श्रद्धा आहे. भारत म्हटल्यावर ‘भारतीयता' आठवते. या सूत्राच्या आधारे समाज जोडायचा आहे,’ असेही डॉ. भागवत म्हणाले.

‘अपूर्ण मूल्यांवर आधारित जीवनपद्धती कंठण्याचे मार्ग फसल्याने जग नव्या मार्गाच्या प्रतीक्षेत आहे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. कोणाचाही विरोध न करता भारताला विश्वगुरू करण्याचा संघाचा संकल्प आहे. त्यासाठी समाजाला ‘आत्मीय' मानणाऱ्या सर्वगुणसंपन्न व्यक्ती हव्या आहेत. प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजसेवेची योग्यता प्राप्त करून देणारा संघ आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विनायक थोरात यांनी प्रास्ताविक केले.

समाज जागरूक हवा
"केवळ नेते आणि सरकारच्या भरवशावर समाज टिकत नाही. नेते आणि सरकार चांगले वागायला हवे असतील तर समाज जागरूक हवा. निःस्वार्थ बुद्धीने देशासाठी काम करू इच्छिणाऱ्यांसाठी संघ हा एकमेव उपलब्ध पर्याय आहे. संघाच्या माध्यमातून समाजहितासाठी सक्रिय व्हा. हा देश माझा आहे या भावनेतून गुणसंघटित समाजाने एक व्हावे,’ असे अावाहनही डाॅ. भागवत यांनी केले.

विविधतेत एकता
"या देशात चालत आलेल्या विविधतेचे दर्शन केले पाहिजे. आजवर कोणीही स्वतः च्या ताकदीवर हा देश जिंकू शकलेला नाही. आपसातल्या फाटाफुटीमुळे पराभव झाला. त्यामुळे सर्व समाजाविषयी प्रेमाची भावना हवी. सामाजिक एकतेतून शक्ती वाढते,’ असे डॉ. भागवत म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad