हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी मुलींनी आपली छाप उमटवली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2016

हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी मुलींनी आपली छाप उमटवली

मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in  -  रविवार १७ जानेवारीला मुंबईत संपन्न झालेल्या तेराव्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत हाफ मॅरेथॉन महिला गटात मराठी कन्यांनी आपली छाप उमटवली. हाफ मॅरेथॉनमध्ये मोनिका राऊत पहिली आली, मनिषा साळुंखेने दुसरा तर, मोनिरा आथरेने तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या गटात हाफ मॅरेथॉनमध्ये दीपक बाबू कुमार पहिला आला. त्याने एक तास सहा मिनिट आणि एक सेकंदात शर्यत पूर्ण केली. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकर मोठया उत्साहाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यंदाचे मुंबई मॅरेथॉनचे हे तेरावे वर्ष होते. सहभागी झालेल्या धावपटूंना चिअरअप करण्यासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि बॉलिवूडचे कलाकार सहभागी झाले होते. जवळपास ४० हजार धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ४२ किमीची मुख्य, २१ किमीची हाफ, सहा किमीची ड्रीम रन आणि सिनियर सिटीजन रन अशा गटात मॅरेथॉन झाली. २१ कि.मी.च्या हाफ मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी वरळी डेअरी येथून सुरुवात झाली. मॅरेथॉमनमधील मुख्य ४२ किमीच्या शर्यतीला राज्यपाल विद्यासागर राव यांनी झेंडा दाखवला. ड्रीमरन मध्ये सहभागी झालेल्या मुंबईकरांनी विविध समस्यांवर सामाजिक संदेश दिला. 
मुंबई मॅरेथॉन स्पर्धा विजेते
४२ किमी मुख्य मॅरेथॉन भारतीय महिला गट विजेते 
१ सुधा सिंह
२ ललिता बाबर 
३ ओपी जैशा 
४२ किमी मुख्य मॅरेथॉन भारतीय पुरुष गट विजेते 
१ नितेंद्र सिंह रावत 
२ गोपी टी 
३ खेता राम 
४२ किमी मुख्य मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय महिला गट विजेते 
१ शुको जिनिमो 
२ बोरनेस किटूर 
३ व्हॅलेंटाईन किपकेटर 
४२ किमी मुख्य मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पुरुष गट विजेते 
१ गाईडऑन किपकेटर
२ सेबोका दीबाबा 
३ मारीअस किमूताई



Post Bottom Ad