मुंबईतील मोकळ्या मैदानाबाबतचं धोरण बहुमताने मंजूर केलेले धोरण – उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2016

मुंबईतील मोकळ्या मैदानाबाबतचं धोरण बहुमताने मंजूर केलेले धोरण – उद्धव ठाकरे

महापालिकेत बहुमत सिद्ध करायला शिवसेनेकडे लोकसभेसारखं बहुमत नाही – उद्धव ठाकरे
मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
‘मुंबईतील मोकळ्या मैदानाबाबतचं धोरण हे फक्त शिवसेनेचं नसून महापालिकेत बहुमताने मंजूर केलेले धोरण आहे. महापालिकेत बहुमत सिद्ध करायला आमच्याकडे लोकसभे सारखं बहुमत नाही. शिवसेनेची एकहाती सत्ता नाही. तसेच या धोरणाचा मी आंधळा पाठीराखा नाही. म्हणून भाजपाला आणि मित्रपक्षांना ते योग्य वाटले म्हणून हा निर्णय घेण्यात आला. परंतु ज्या पद्धतीने या विषयाचे राजकारण केले जातेय ते अतिशय क्लेशकारक असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वच्या पंप हाउस येथील भुयारी मार्ग रुंदीकरणाचे भूमिपूजन आज रविवारी (दि. 17 जानेवारी) रोजी सकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सध्याच्या बहुचर्चित मोकळ्या मैदानाच्या धोरणाबाबत सरकारमधील मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला. 


‘या धोरणात मोकळ्या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी नाही. याही पुढे जाऊन RG/PG प्लाॅटमध्ये 15% बांधकामास परवानगी आहे ती देखील परवानगी देऊ नका असं महापालिका आयुक्तांना सूचना दिली आहे. आमचा उद्देश्य आहाच कि या बेवारस पडलेल्या भूखंडांना कोणीतरी रखवालदार मिळावा यासाठी ही दत्तक योजना आहे. सदर भूखंडावरील मालकी हक्क हा महापालिकेचा राहणार आहे. ‘केंद्रसरकारच्या भूसंपादन विधेयकासारखं हे धोरण अजिबात नाही. भूसंपादनाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून मोठ्या उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचा केंद्राच्या डावाला शिवसेनेने विरोध केल्याने त्याला केराची टोपली दाखवली असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

‘मुंबईतील मोकळी मैदाने ही जनतेसाठीच राहतील त्यावर जर अतिक्रमण करेल अथवा राजकीय दबाव आणून गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करेल पण ही वेळ आम्ही येवू देणार नाही. रेसकोर्सची 225 एकर एवढी मोठी जागा कोणती तरी संस्था आपल्या ताब्यात ठेवते. त्या जागेचा हवा तसा वापर करते तेंव्हा कोणीही बोलत नाही. ही जागा मुंबईकरांसाठी उपलब्ध व्हावी असे आम्हालाही वाटते असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

जोगेश्‍वरी आणि अंधेरी पंपहाऊस भुयारी मार्गांच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार
कित्येक वर्षापासून रखडलेले जोगेश्‍वरी जनता कॉलनी आणि अंधेरी पूर्व येथील पंपहाऊस या दोन्ही भुयारी मार्गांच्या रुंदीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील जनता कॉलनी आणि पंपहाऊस हे दोन्ही भुयारी मार्ग म्हणजे वाहनचालक आणि रहिवाशांसाठी एक दिव्यच ठरत होते. आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेने या भुयारी मार्गांच्या रुंदीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही हे काम झाले नाही. जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार, गृहनिर्माण तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी या मार्गाचे रुंदीकरण करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज दोन्ही भुयारी मार्गांचे रुंदीकरणाचे भूमिपूजन होऊन स्थानिक रहिवाशी आणि वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. याप्रसंगी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, आमदार सुनील प्रभू, आमदार अ‍ॅड. अनिल परब, आमदार रमेश लटके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या एस ऑफ ड्युयिंग बिजनेसवर लक्ष्य…
‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत व्यावसायिकांना उद्योग करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध उपाय केले आहेत. या मुख्यमंत्र्यांच्या एस ऑफ ड्युयिंग बिजनेसचा अभ्यास आम्ही पण करत आहोत. त्यात जर कुठे कमतरता आढळली तर आम्हाला आमचा मार्ग पत्करावा लागेल.

साहित्य संमेलनावर नाराजीचा सूर…
कालच पिंपरी येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले कि ‘साहित्य संमेलन भरवणारे भरवत असतात आणि जाणारे जात असतात त्यातून काय साध्य होते हे मला माहित नाही’ असे म्हणून नाराजी व्यक्त केली.

Post Bottom Ad