मुंबई / JPN NEWS.in - वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांकडून आता रोखीने नव्हे, तर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारेच दंडाची वसुली करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पाेलिसांनी घेतला अाहे. १२ जानेवारीपासून राजधानीत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार अाहे.
त्यासाठी मुख्य चाैकांतील पाेलिसांकडे ई-चालानच्या मशीन्स पुरवण्यात अाल्या अाहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहपाेलिस अायुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. पाेलिस कर्मचाऱ्यांकडून हाेणाऱ्या भ्रष्टाचाराला अाळा घालण्यासाठी ही दंडवसुली पद्धत सुरू करण्यात अाली अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे १२ जानेवारी राेजी उद््घाटन हाेणार अाहे. ज्या वाहनधारकांकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसेल त्यांना इंटरनेट बँकिंगद्वारे दंड भरावा लागेल. त्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल, मात्र या मुदतीत रक्कम भरणाऱ्यांकडून नंतर प्रतिदिन १० रुपयेप्रमाणे अतिरिक्त दंडवसुली केली जाईल.
No comments:
Post a Comment