मुंबई / JPN NEWS.in विक्रीकर विभागातील विक्रीकर उपआयुक्त या संवर्गातील 33 टक्के अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवडश्रेणी मंजूर करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विक्रीकर उपआयुक्त (निवडश्रेणी) या पदाची वेतनश्रेणी लागू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने विक्रीकर उपआयुक्त या मूळ संवर्गात किमान तीन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे.
विक्रीकर विभागाची 2011 मध्ये पुनर्रचना करण्यात आली असून विक्रीकर उपआयुक्त संवर्गाची मंजूर पदसंख्या 401 तर या संवर्गातून पदोन्नती शक्य असलेल्या विक्रीकर सहआयुक्त या संवर्गाची मंजूर पदसंख्या 72 आहे. या संवर्गातील मंजूर 72 पदांपैकी पाच पदे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडून तर उर्वरीत 67 पदे विक्रीकर उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांमधून 100 टक्के पदोन्नतीने भरण्याची तरतूद आहे. मंजूर पदसंख्येनुसार विक्रीकर उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांना विक्रीकर सहआयुक्त पदावर पदोन्नती होण्यासाठी सर्वसामान्यपणे 14 वर्षाहून अधिक कालावधी लागत असल्याची तक्रार आहे. विक्रीकर उपआयुक्त आणि विक्रीकर सहआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांचे सरासरी वयोमान विचारात घेता 14 वर्षाहून अधिक कालावधीसाठी विक्रीकर उपआयुक्त संवर्गात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त होत जाईल. त्यामुळे सद्यस्थितीत विक्रीकर उपआयुक्त संवर्गात कुंठीतता असल्याची तक्रार या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यावर उपाय म्हणून वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
सध्या विक्रीकर उपआयुक्त (वेतनबँड 15,600-39,100 रूपये, ग्रेड वेतन 6,600) या वेतन संरचनेतील संवर्गातच कुंठितता दिसून येते. यामुळे विक्रीकर उपआयुक्त या संवर्गास 33 टक्के वरिष्ठ वेतनश्रेणी (वेतनबँड 15,600-39,100 रूपये, ग्रेड वेतन 7,600) लागू करण्यात येणार आहे. विक्रीकर उपआयुक्त (निवडश्रेणी) पदाचे सेवा प्रवेश नियम येत्या सहा महिन्यात अधिसूचित करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment