बेस्टचा कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय - वीज ग्राहकांना ई-पेमेंट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2016

बेस्टचा कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय - वीज ग्राहकांना ई-पेमेंट

JPN NEWS ( Voice Of Citizens ) http://jpnnews.in
मुंबई - बेस्ट प्रशासनाने बेस्टचा कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेस्ट भवन व सर्व आगारांमध्ये पेपरलेस आणि ई ऑफिस संकल्पना राबवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पावले उचलली आहेत. 

बेस्ट भवन आणि आगारांमध्ये पडलेल्या फायली व त्या सांभाळून ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे बेस्टच्या आस्थापन खर्चामध्ये भरमसाट वाढ होत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बेस्टचा कारभार पेपरलेस व ई कार्यालय करण्यावर नव्या वर्षात भर दिला जाणार आहे. पेपरलेस ऑफिस या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील प्रयत्नशील आहेत. आस्थापना खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, यासाठी बेस्ट समिती सदस्यही आग्रही आहेत. बेस्टचा 2016-17 या वर्षीचा अर्थसंकल्प नुकताच पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला. या वेळी आस्थापना खर्च कमी करण्यासाठी ई ऑफिस आणि पेपरलेस ऑफिस करण्यावर भर द्यावा, अशी सूचना पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली. 

विजेची देयके भरण्यासाठी बेस्टच्या वीज ग्राहकांना भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे ई-पेमेंट करणे हा पर्याय आता ग्राहकांना निर्माण करून देणार आहोत. त्यासाठी साडेचार लाख ग्राहकांचे ईमेल उपलब्ध झाले आहेत. ई पेपर्सवरही भर दिला जाईल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad