रोहित वेमुला प्रकरणी मुंबईत मूक निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2016

रोहित वेमुला प्रकरणी मुंबईत मूक निदर्शने

मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याने व्यवस्थेला आणि राजकीय दबावाला कंटालून आत्महत्या केली. याचे पडसाद जगात उमटू लागले आहे. रोहितला न्याय मिळावा म्हणून गुरुवारी रोहित वेमुला जस्टिस फोरमच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानासमोर मानवी साखळी बनवून मूक निदर्शने करण्यात आली.

रोहित वेमुला जस्टिस फोरमच्या वतीने मानवसाखळी बनवण्यासाठी मुंबईमधील विविध महाविद्यालयाती शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी सामाजिक चलवलीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना रोहितच्या प्रकरणात केंद्रीय मंत्र्यानीच पत्र पाठवले आहे. यामुले न्याय कसा मिळेल ? असा प्रश्न वैभव छाया यांनी उपस्थित केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बंडारू दत्तात्रय आणि स्मृती इरानी यांच्यावर कारवाई करुन मंत्र्यांचा राजिनामा घेतील याची शाश्वती नसल्याने राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा आणि स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रय या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. रोहितच्या आत्महत्तेला जबाबदार असलेल्या एबिविपी या विद्यार्थी संघटनेवर देशभरात बंदी घालावी अशी मागणी अशी मागणी वैभव छाया यांनी केली आहे.

Post Bottom Ad