बाईकस्वार आणि बेस्ट चालकांचे रॅश ड्रायव्हिंग - नऊ महिन्यांत २२ जणांचा बळी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2016

बाईकस्वार आणि बेस्ट चालकांचे रॅश ड्रायव्हिंग - नऊ महिन्यांत २२ जणांचा बळी

JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in    मुंबई  –  बेस्ट बसमुळे होणार्‍या अपघातांच्या संख्येने गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला आहे. फुटपाथ सोडून चालणारे पादचारी आणि बेफामपणे कसेही लाइन सोडून मोटारसायकल दामटवणारे बाईकस्वार आणि बेस्टमध्ये नव्याने भरती झालेल्या चालकांचे रॅश ड्रायव्हिंग यामुळे नऊ महिन्यांत २२ जणांना जीव गमवावा लागला. याबाबतचा हरकतीचा मुद्दा काँग्रेसचे रवी राजा यांनी आजच्या समितीच्या बैठकीत उपस्थित केला. या ड्रायव्हर, कंडक्टरना विश्रांती व जेवायलाही व्यवस्थित जागा नसते, असाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

अशा अपघातांमध्ये चूक कोणाचीही असली तरी प्रशासनाकडून नेहमीच ड्रायव्हर, कंडक्टरना शिक्षा केली जाते. त्यांना बडतर्फ केले जाते. काहीही जाणून न घेता त्यांना शिक्षा करणे योग्य नसल्याचा मुद्दा सुहास सामंत यांनी मांडला. त्यांना प्रशिक्षण, समुपदेशन द्या अशी मागणी सुनील गणाचार्य यांनी केली. चूक असेल तर कारवाई करावी पण अनेकदा पोलीस ड्रायव्हरला क्लीन चिट देतात पण प्रशासन बडतर्फ करते हे बरोबर नसल्याचेही ते म्हणाले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टरला शिक्षा करण्यापेक्षा त्यांचे समुपदेशन करा आणि त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील अशा सुविधा द्या अशी मागणी बेस्ट समितीमध्ये सदस्यांनी केली. 

बेस्टच्या बसस्टॉपवरील झोपड्या, फेरीवाले व चारचाकी गाड्यांच्या पार्किंगने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रशासनाने पालिका, वाहतूक पोलीस, पोलीस यांना पत्र लिहून हे पदपथ मोकळे करावेत असे निर्देश अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी प्रशासनाला दिले. बाईकस्वार आणि पादचार्‍यांचा समावेश या अपघातांमध्ये बळी पडलेल्यांमध्ये बाईकस्वार आणि पादचारी यांचाच समावेश असल्याची कबुली महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिली. चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगच्या सवयी सोडण्यासाठी त्यांचे समुपदेशन, प्रशिक्षण व त्याचबरोबर निरीक्षकांची संख्या वाढवण्यात येईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. 

अपघातातील आकडेवारी वर्ष मृत 
२००६-०७   ५२ 
२००७-०८   ४० 
२००८-०९   ५० 
२००९-१०   ४३ 
२०१०-११   ४७ 
२०११-१२   २६ 
२०१२-१३   ३० 
२०१३-१४   ३१ 
२०१४-१५   २२

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad