JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित'प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४' या अंतर्गत प्रस्ताविलेल्या विकास नियोजन रस्त्यांबाबतची माहिती महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेत स्थळावरील "प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४- २०३४” या `लिंक' अंतर्गत असणा-या `Road Survey Dec-2015' या उप `लिंक' अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्वेक्षणाबाबत संबंधितांनी त्यांची निरीक्षणे (Observations) संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विहीत नमुन्यात ३१ जानेवारी २०१६ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.
महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर डाव्या बाजूला खालच्या बाजूस हिरव्या रंगात`क्लिनअप मुंबई' चे बोधचिन्ह आहे. याच बोधचिन्हाखाली 'प्रारुप विकास नियोजन आराखडा २०१४ – २०३४' (इंग्रजी मध्ये: “Draft Development Plan (2014-34)”)अशी लिंक आहे. या लिंक वर`क्लिक' केल्यावर जे पान उघडते त्याच पानावर सर्वात खाली"Road Survey Dec-2015” अशी लिंक आहे. याच लिंकवर`क्लिक' केल्यावर जे पान उघडते त्यावर पहिल्या क्रमांकांच्या"statement-road survey-marathi.pdf” या लिंक अंतर्गत प्रस्ताविलेल्या विकास नियोजन रस्त्यांबाबतची माहितीबाबत निवेदन देण्यात आले आहे. तर दुस-या क्रमांकाच्या "DP Road observations table.pdf" लिंक अंतर्गत या बाबत निरिक्षणे नोंदविण्याचे प्रारुप (तक्ता / Table) उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
याच पानावर तिस-या, चौथ्या व पाचव्या क्रमांकांतर्गत अनुक्रमे शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या अंतर्गत असणा-या महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील माहिती क्रमवार पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बाबत महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व माहिती नकाशांमध्ये चिन्हांकित केलेल्या रस्त्यांच्या अनुषंगाने पहावयाची आहे. यानुसार चिन्हांकित केलेले नकाशे महापालिकेच्या त्या - त्या संबंधित विभाग कार्यालयांमध्ये (Ward Office) प्रदर्शित करण्यात आले आहेत. या नकाशांमध्ये पूर्णपणे शेंदरी रंगाने दर्शविलेले रस्ते हे प्रस्तावित विकास नियोजन रस्ते आहेत.
वरील तपशिलानुसार प्रस्ताविलेल्या विकास नियोजन रस्त्यांबाबतची निरीक्षणे कळविण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रारुपामध्ये (तक्ता / Table) ee.dpr.mcgm.rd.survey.2015@ gmail.com या इ-मेल पत्त्यावर किंवा पत्राद्वारे प्रमुख अभियंता (विकास नियोजन), ५ वा मजला, नवीन विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१ नमूद केलेल्या पत्यावर कळवावीत.निरिक्षणे कळविताना इ-मेल च्या 'subject' मध्ये किंवा पत्राने कळवावयाचे झाल्यास पाकीटावर "विकास नियोजन रस्त्यांचे सर्वेक्षण डिसेंबर २०१५" अथवा “D.P. Road Survey December 2015" हे लिहिणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment