मॅनहोल्समध्ये पडल्याने जखमी व्यक्तीचा पालिकेवर दीड कोटींचा दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2016

मॅनहोल्समध्ये पडल्याने जखमी व्यक्तीचा पालिकेवर दीड कोटींचा दावा

JPN NEWS ( Voice Of Citizens ) http://jpnnews.in 
मुंबई - वांद्रे येथील कार्टर रोडवरील मॅनहोल साफसफाईसाठी उघडा राहिल्याने त्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्या जखमी व्यक्तीचे नाव विजय हिंगोरानी असे असून त्याने या अपघातप्रकरणी पालिकेवर दीड कोटीचा नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे रस्त्यांवरील उघडे मॅनहोल्स मृत्यूचा सापळाच ठरत असल्याचे यातून सिद्ध होत आहे. 

अपघाताबद्दल पालिकेच्या संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले, की कार्टर रोड येथे साफसफाई करण्यासाठी एक कामगार मॅनहोलमध्ये उतरल्याने तो अर्धवट उघडा होता. मॅनहोल खोलल्यामुळे त्याभोवती चिखल झाला होता. अपघात झालेली व्यक्ती दुचाकीवरून येत होता. चिखलामुळे त्याची गाडी घसरली आणि मॅनहोलमध्ये पडून तो जखमी झाला. त्यात त्याच्या डाव्या पायाला जखम झाली. पाय फ्रॅक्‍चर झाल्याचे उपचारानंतर उघडकीस आले. त्याला तातडीने नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल केले आणि उपचारानंतर सोडून देण्यात आल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. 

विजय हिंगोरानी याला बेंगळूरु येथे गेल्या डिसेंबरमध्ये नव्या नोकरीसाठी रुजू व्हायचे होते; मात्र अपघात झाल्याने डॉक्‍टरांनी त्याला सहा महिन्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मला या अपघातामुळे नोकरी गमवावी लागल्याची शक्‍यता होती, असे हिंगोरांनी याने सांगितले. बेंगळूरु येथे त्याला दरमहा अडीच लाख वेतनाची नोकरी मिळाली होती. त्याला गेल्या एक जानेवारीला नोकरीवर रुजू होण्यास सांगण्यात आले होते. त्याच्या कुटुंबासाठी विजय हा मोठा आधार आहे; मात्र अपघातानंतर त्याने पालिकेवर दीड कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. अपघातामुळे आपणास शारीरिक नुकसान झाले असून वैद्यकीय उपचारासाठीही मोठा खर्च आला आहे. त्यामुळे आपण नुकसानभरपाईचा दावा पालिकेविरोधात दाखल केल्याची माहिती हिंगोरानी याने दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad