मुंबई : 10 जानेवारी 2016
JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in
विक्रोळी पार्क साईट बीएमसी वसाहत येथील ४० वर्ष जुन्या सुभेदार रामजी मालोजी उद्यानात राष्ट्रवादीचे नगरसेवक हारून खान पाण्याची टाकी बांधून उद्यान हडपण्याचा डाव आखत आहेत असा आरोप करत भीमसैनिकानी मोर्चा काढून तीव्र आंदोलन करत उद्यान वाचवण्यासाठी तीव्र आंदोलन करत पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी विक्रोळी पार्कसाईट येथील हजारो भीमसैनिक आणि स्थानिक नागरिकानी आंदोलनात सहभाग दाखवत नगरसेवक व महापालिकेच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली .
विक्रोळी पार्कसाईट येथे महानगरपालिकेचे ३ एकर भूखंड असणाऱ्या ४० वर्ष जुने सुभेदार रामजी मालोजी उद्यान आहे . या उद्यानाची झालेली दुरवस्था पाहता, स्थानिक नागरिक व आंबेडकरी जनतेने याच्या डागडूजी आणि पुनर्विकासासाठी पालिकेकडे अर्ज सुद्धा दाखल केलेले आहेत, परंतु राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक हारून खान यांनी पालिकेकडून परवानगी मिळवत, याच उद्यानात पाण्याची टाकी उभारण्याची योजना आखल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला होता .
सुभेदार रामजी आंबेडकर उद्यान हे पार्कसाईट येतील एकमेव उद्यान असताना या उद्यानातच पाण्याची टाकी बांधण्याच्या पाठीमागे नगरसेवकाचा उद्देश स्थानिक जनतेला पाणीपुरवठा करण्याचा नव्हे, तर कैलास कॉम्प्लेक्स येथील टॉवर बांधकामासाठी आणि येथील कार्यालयांना पाणीपुरवठा करण्याचा आणि त्या मार्गे हे ४० वर्ष जुने उद्यान हडप करण्याचा डाव आहे, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहे.
रविवारी १० जानेवारीला सायंकाली ४ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात येणार होते . परंतु सकाळ पासूनच आक्रमक झालेल्या पार्कसाईट येथील भीमसैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आंबेडकर चौकापासून रामजी आंबेडकर उद्यानापर्यंत हजारो भीमसैनिकांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढला आणि उद्यानातील भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळवून लावला.
उद्यान वाचवण्यासाठी विभागातील भीमसैनिक निषेध मोर्चा काढणार आहे असे कळताच पार्कसाईट पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर उद्यान आमची अस्मिता आहे ह्या उद्यानातील पाण्याची टाकी बांधण्याची परवानगी महापालिकेने दिले आहे ती त्वरित रद्द करावी अन्यथा याचे मुंबईभर पडसाद उमटतील असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान भीमसैनिकंचा आणि स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध पाहता राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी भूमीपुजनाच्या ठिकाणी येण्याचे टाळले आहे. नगरसेवक हारून खान यानीही आंदोलकर्त्यांची भेट घेवुन पालिकेनेच टाकी बांधायला परवानगी दिली आहे असे सांगत बचावात्मक पावित्रा घेतला होता.
No comments:
Post a Comment