वादाच्या भोवऱ्यात सापडलेली "क्‍लीनअप मार्शल‘ योजना पुन्हा सुरू होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2016

वादाच्या भोवऱ्यात सापडलेली "क्‍लीनअप मार्शल‘ योजना पुन्हा सुरू होणार

मुंबई / www.jpnnews.in - वादाच्या भोवऱ्यात सापडलेली महापालिकेची "क्‍लीनअप मार्शल‘ योजना पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी एजन्सीची यादी तयार करून येत्या महिन्याभरात "क्‍लीनअप मार्शल‘ नेमण्याचे काम पूर्ण होईल. मात्र या मार्शलची नेमणूक संपूर्ण शहरात न करता फक्त शहर आणि उपनगरातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी व काही महत्त्वाच्या ठिकाणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. 

मुंबईच्या स्वच्छतेसाठी पालिकेने नेमलेल्या "क्‍लीनअप मार्शल‘नी केलेल्या गैरव्यवहारामुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. कचरा करणाऱ्यांकडून दंडाच्या स्वरूपात जमा करण्यात येणारी रक्कम या मार्शलनी पालिकेकडे जमा केली नाही. काही मार्शल कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून त्यांच्याकडून दंडाची नियमबाह्य वसुली करत होते, तर काही दंड आकारून पावत्या देत नव्हते. पालिकेच्या स्थायी समितीत याविषयी वारंवार नगरसेवकांनी तक्रारी केल्या. ही योजना स्वच्छतेचे काम करीत नसून योजनेत गैरव्यवहार वाढल्याची बाब सदस्यांच्या लक्षात आली. त्यामुळे योजना रद्द करण्याच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार या योजनेला स्थगिती दिली होती. मात्र शहर व उपनगरांतील पर्यटन स्थळे व काही महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेसाठी या योजनेचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. त्यासाठी चांगले काम करणाऱ्या एजन्सींची यादी तयार करण्याचे काम सुरू असून येत्या महिन्याभरात "क्‍लीनअप मार्शल‘ योजनेसाठी एजन्सी नेमल्या जातील, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. 

Post Bottom Ad