मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2016

मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
मातंग समाजासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसंदर्भात अखिल भारतीय मातंग समाजाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत 4 फेब्रुवारीला बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी दिली. 

गोपले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मातंग समाजाने आंदोलन केले. यावेळी दानवे उपस्थित होते. केंद्र सरकारकडे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात शिफारस करावी, अशी आमची मागणी आहे, असे गोपले म्हणाले. आंदोलनात अखिल भारतीय संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, भारतीय बहुजन युवक आघाडी, महिला आघाडी यांनी भाग घेतला. मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात कुसुम गोपले, डी. बी. अडांगळे, मुकुंद वायदंडे, बाळासाहेब माने आणि देवेंद्र खडसे यांचा समावेश असेल, अशी माहिती गोपले यांनी दिली.

Post Bottom Ad