उद्योगक्षेत्रातील ताऱ्यांना विनामूल्य भेटण्याची सुवर्णसंधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2016

उद्योगक्षेत्रातील ताऱ्यांना विनामूल्य भेटण्याची सुवर्णसंधी

मुंबई / JPN NEWS.in / 2 Jan 2016
सन १९९०. स्थळ- पुणे, वय, २४ वर्षे. बीजभांडवल फक्त १५ हजार रुपये. सन २०१५. उलाढाल अंदाजे २०० कोटी रुपये. जगातील ५० हून अधिक देशांत व्यवसायाचा विस्तार. ही आकडेमोड आहे जगातील सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ऍंटिव्हायरस तयार करणाऱ्या कंपनीची. एका मराठमोळ्या तरुणाची. क्विकहील या कंपनीचे मालक कैलाश काटकर यांची. शून्यातून सुरुवात करुन पहिल्या पिढीतील या उद्योजकाने ऍंटिव्हायरस सॉफ्टवेअर उद्योगक्षेत्रात स्वत:चं अढळपद निर्माण केलं आहे. कैलाश काटकरांची यशोगाथा मोफत ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. मराठी बिझनेस क्लब (एमबीसी) या मराठी उद्योजकीय संस्थेच्या वर्धापन दिनास ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सावरकर सभागृह शिवाजी पार्क येथे क्विकहील टेक्नॉलॉजिझचे अध्यक्ष कैलाश काटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


याच कार्यक्रमात रक्षक ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, स्टील आणि लाकडी फर्निचरचे उत्पादक विजयकुमार माळवदकर, शाहू बॅंकेचे संस्थापक अर्जुन आहेर पाटील, संपूर्ण भारताला फिरते शौचालय पुरविणारे धनंजय बेळे, ७ वेळा ‘मिस्टर इंडिया’, एकदा ‘मिस्टर युनिवर्स’, ‘मिस्टर वर्ल्ड’ असा खिताब मिळविणारा विख्यात शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले आदींचा ‘एमबीसी उद्योगतारा’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या प्रसिद्ध उद्योजकांचा उद्योजकीय प्रवास जाणून घेण्याची आणि त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची प्रत्येकाला सुवर्णसंधी असून कार्यक्रम विनामूल्य आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी बिझनेस क्लब (एमबीसी)चे अध्यक्ष सुहास कुंभार यांनी केले आहे. आगाऊ नावनोंदणीसाठी संपर्क- रेखा ९८२०१ १४४१३, ९८१९७ ५४२२६.     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad