मुंबई / JPN NEWS.in / 2 Jan 2016
पठाणकोट येथे जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो. या हल्ल्यामध्ये आपले तीन भारतीय जवान शहीद झाले. पण त्यांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्याचा मी निषेध व निंदा करतो. शहीद जवानांना मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि सरकारला आवाहन करतो की, देशाच्या सुरक्षेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. सरकारने देशाच्या सुरक्षेकडे गांभीर्याने बघावे व त्यासाठी ताबडतोब ठोस पाऊले उचलावीत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले...
पठाणकोट येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले. याचा निषेध म्हणून काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार भाई जगताप यांचा सत्कार समारंभ रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई कोंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
पठाणकोट येथे जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो. या हल्ल्यामध्ये आपले तीन भारतीय जवान शहीद झाले. पण त्यांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्याचा मी निषेध व निंदा करतो. शहीद जवानांना मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि सरकारला आवाहन करतो की, देशाच्या सुरक्षेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. सरकारने देशाच्या सुरक्षेकडे गांभीर्याने बघावे व त्यासाठी ताबडतोब ठोस पाऊले उचलावीत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले...
या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व काँग्रेस कार्यकारणी समिती सदस्य गुरुदास कामत, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, असलम शेख, वर्षा गायकवाड, अमीन पटेल, माजी आमदार चरणसिंह सप्रा, राजहंस सिंह, जनार्दन चांदुरकर, चंद्रकांत हंडोरे, बाबा सिद्दिकी, श्याम सावंत, सुधा जोशी, मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जवानांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली व कार्यक्रम रद्द करण्यात आला.
No comments:
Post a Comment