मुंबई / www.jpnnews.in मंत्रालय स्तरावरील प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्यावर्षी २६ जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून अाता सर्व जिल्ह्यांतील जनतेसाठी सेवा उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलद्वारे गेल्या १५ ऑगस्टला प्रायाेगिक तत्वावर सहा जिल्ह्यांसाठी तक्रार निवारण प्रणाली उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर पाच महिन्यातच सर्व जिल्ह्यांसाठी ही सेवा उपलब्ध झाली अाहे.
नागरीकांना ऑनलाइन तक्रारी सादर करता याव्यात यासाठी गेल्या प्रजासत्ताकदिनी शासनाने ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले हाेते. लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध विभागांच्या २५२ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४७ सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. २६ जानेवारीपासून १५० हून अधिक सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात या पाेर्टलवर २३ हजार तक्रारी प्राप्त झाल्या अाहेत. https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील अापले सरकार या वेब पाेर्टलवर तक्रार करता येईल. प्रतिसादाची हमी हे पोर्टलचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी या संदर्भात जबाबदार असेल. तसेच २१ दिवसांत तक्रारीची स्थिती तक्रारदाराला कळणार अाहे.