मुंबई / JPN NEWS.in बृहन्मुंबई महानगपालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करीत असली तरी, महानगरपालिकेच्या सर्वच प्रसुतीगृहांमध्ये ; नवजात शिशु अतिदक्षता ' विभागाची सुविधा उपलप्ध नाही , परिणामी गरीब मातांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात , तर काही वेळा नवजात शिशूंच्या प्राणावरहि बेतते , याचा विचार करून मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयातील प्रसुतीगृहन्मध्ये नवजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी ; नवजात शिशु अतिदक्षता विभाग ' स्थापन करण्यात यावा अशी मागणी मन से नगरसेविका आसावरी पाटील यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.
मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बालकांची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे अशा नवजात शिशुना अतिदक्षता विभागात काचेच्या पेट्यांमध्ये ठेवण्यात येते , मात्र महानाग्पालीकेच्या सर्वच प्रसूतिगृहात नवजात शिशु अतिदक्षता विभागाची सुविधा उपलप्ध नसल्याने गरीब रुग्णांना अशावेळी खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते , मात्र त्या ठिकाणी नवजात बालकांना काचेच्या पेट्यांमध्ये ठेवण्यासाठी आकारण्यात येणारे भरमसाठ शुल्क गरीब रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही , त्यामुळे त्यांचे खूप हाल होतात , आणि या धावपळीत नवजात बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो , त्यामुळे याबाबत पालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून नवजात शिशु अतिदक्षता ' विभाग सुरु करावेत , अशी मागणी पाटील यांनी केली आहे
No comments:
Post a Comment