प्रभावी इंधन असणारे पॅलेट्स व बिक्रेट्स बनविण्याचा उपक्रम यशस्वी
दररोज १६ टन `ग्रीन वेस्ट' वर प्रक्रिया करुन ८ ते १० टन पॅलेट्स व बिक्रेट्स ची निर्मिती
मुंबई / JPN NEWS.in बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विषयक बाबींचे व्यवस्थापन, नियोजन व अंमलबजावणीची सर्व जबाबदारी सांभाळणारे आणि दररोज मोठ्या प्रमाणातील कच-याचे व्यवस्थापन करणारे खाते म्हणजे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खाते. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या नेतृत्वात ‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत महापालिकेद्वारे व महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे स्वच्छता विषयक विविध नाविन्यपूर्ण व प्रयोगशिल उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत महापालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या अनेक नाविन्यपूर्ण व प्रयोगशिल उपक्रमांमध्ये एक महत्वाचा संयुक्त उपक्रम म्हणजे महापालिका क्षेत्रातून जमा होणा-या हरित कच-यापासून `पॅलेट्स' व `बिक्रेट्स' ची निर्मिती करण्याचा प्रकल्प होय ! दंडगोलाकृती असणारे `ग्रीन पॅलेट्स' व छोट्या विटेसारखे दिसणारे `बिक्रेट्स' हे एक प्रभावी व ज्वलनशील इंधन आहे. घाटकोपर (पश्चिम) येथे हरित कच-यापासून `पॅलेट्स' व `बिक्रेट्स' निर्मिती व दैनिक १६ टन क्षमतेचा प्रकल्प करण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सध्या या प्रकल्पामध्ये दररोज सुमारे १६ टन कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासुन सुमारे ८ ते १० टन इतक्या प्रमाणात `पॅलेट्स' व `बिक्रेट्स' ची निर्मिती करण्यात येत आहे.
देशाला नव्हे तर संबंध जगाला भेडसावणारी महत्त्वाची समस्या म्हणजे कचरा. या कच-याचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप संस्थेच्या सहाय्याने घाटकोपर (पश्चिम) येथे लालबहादूर शास्त्री मार्गावरील अशोक सिल्क मिलच्या बाजूला १००० चौरस मीटर जागेवर हरित कच-यापासून पॅलेट्स व बिक्रेटर्सचा कारखाना सुरु केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप (सीपीएल) या संस्थेशी समन्वय साधून घाटकोपर (पश्चिम) मध्य रेल्वे मार्गाजवळील बाजूस १००० चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर पूर्वी अतिक्रमण व समाज कंटकांची मोठी समस्या होती. या जागेचे व्यवस्थापन करणे महापालिका प्रशासनाला गरजेचे वाटत होते. या अनुषंगाने चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप संस्थेच्या मदतीने या जागेचे व्यवस्थापन करणे पालिकेला शक्य झाले आहे.
हरित कचरा (ग्रीन वेस्ट) गोळा करुन त्याचे परिमंडळनिहाय अशा स्वरुपाचे पॅलेट्स आणि ब्रिकेटर्स उत्पादन करावे, हे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप या संस्थेला सदर जागा केवळ पाच वर्षांच्या मुदतीवर घाटकोपर (पश्चिम) येथे उपलब्ध करुन देण्यात आली होती. आज त्याच जागेवर झाडांचा पाला-पाचोळा, फांद्या यासारख्या सुमारे १६ टन इतक् हरित कच-यापासून पॅलेट्स व बिक्रेट्स तयार करण्यात येत आहेत.
या प्रकल्पामधून सुरुवातीला हरित कच-यापासून ‘पॅलेट्स’ च्या निर्मितीचा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या प्रकल्पात बिक्रेट्स देखील तयार करण्यात येत आहेत. प्रकल्पाच्या जवळपासच्या क्षेत्रातून सध्या दररोज सुमारे १६ टन हरित कचरा गोळा करुन त्यावर घाटकोपर येथे प्रक्रिया करण्यात येत असल्यामुळे पालिकेच्या वाहतूक खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यासोबत हरित कच-याचा परिपूर्ण व १०० टक्के वापर करुन त्यापासून जळाऊ इंधन तयार केले जात असल्याने आजूबाजूला पसरणा-या दुर्गंधीपासून नागरिकांचे संरक्षण होणार आहे. तसेच यामुळे नागरिकांचे आरोग्यही जपले जाणार आहे
No comments:
Post a Comment