शहरातील अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट कडे असलेल्या लो फ्लोअर बसेस जुन्या व धोकादायक झाल्यामुळे त्या जागी नवीन बसगाड्या घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर आज बेस्ट समिती सदस्यांनी विरोध दर्शविल्यामुळे बेस्ट प्रशासनास माघार घ्यावी लागली , त्यामुळे येणाऱ्या काळात ह्याच जुन्या बसगाड्या रस्त्यावर धावल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३० लो फ्लोअर बसगाड्या आहेत , ह्या बसगाड्यांमध्ये अपंग प्रवाशांना आपली व्हील चेअर घेऊन बसमध्ये चढता यावे म्हणून रेम्प ची हि सोय केली आहे. मात्र ९ - १० वर्षांपूर्वी खरीदी केलेल्या ह्या बसगाड्यांची अवस्था बिकट झाली असून प्रवाशाना तसेच चालक व वाहकांना ह्या बसगाड्या तापदायक ठरत आहेत, ह्या बसगाड्यां चालताना प्रचंड ध्वनी प्रदूषण करत असून , बसमधून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर फेकला जात आहे , तसेच मुंबईच्या दमट हवामानामुळे संपूर्ण बस चा सांगाडा गांजलेला आहे. ह्या बसगाड्यांची संरचना मधल्या दरवाज्याजवळ तुटलेली असून छप्पर वेगळे झाले आहे त्यामुळे मागील भाग दाबला गेला असून तो कधीही तुटला जाऊ शकतो , ह्यामुळेच सदर बसगाड्यांच्या जागी नवीन बसगाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव आज बेस्ट ने आणला होता . मात्र टाटा कंपनीच्या ह्या नवीन बसगाड्यांची किंमत महागडी असल्यान तसेच ह्या बसगाड्यांमधून अपंग प्रवास करत नसल्याचे कारण देत बेस्ट सदस्यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास भाग पाडले .
> ह्या प्रस्तावावर बोलताना कोन्ग्रेस च्या रवि राजा यांनी गेल्या १० वर्षात ह्या बसगाड्यांमधून किती अपंगांनी प्रवास केला व ह्या बसगाड्या कोणकोणत्या मार्गांवरून धावल्या तसेच ह्याद्वारे बेस्टला किती उत्पन्न मिळाले ह्याची माहिती देण्याची मागणी केलि. तसेच ज्या अपंगांसाठी ह्या बसगाड्या खरेदी केल्या होत्या त्या मात्र फोर्ट फेरी म्हणून शहरात धावत आहेत , मग अपंगांच्या नावाखाली ह्या महागड्या बसगाड्या घेण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवालही त्यांनी यावेळी केला . १० वर्षांपूर्वी एका स्टार बस ची किंमत २२ लाख एवढी होती , आता त्याची किंमत ४८ लाख झाली असून इतर सर्व कर पकडून ह्याची किंमत ६४ लाखां पर्यंत जात आहे , जर ह्या बसेस अपंगांसाठी घेतल्या जात असतील तर ह्या बस गाड्यांवरील सर्व कर हे राज्य सरकारने व केंद्र सरकारने माफ केले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केलि. तर म न से चे चे केदार हॊम्बा ळकर यांनी बेस्ट ची आर्थी क परिस्थिती नसताना ह्या बसगाड्या घेणे बेस्ट ला खर्चिक असल्याचे नमूद केले. तसेचटाटा बसगाड्याची एकूण कामगिरीच खराब निघाल्याने बेस्ट मध्ये टाटा ला हद्दपार करण्याची मागणी केलि.
ह्यावर बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या बसगाड्या घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले , तसेच सध्याच्या बसगाड्या ह्या रस्त्यावर धावण्याच्या परिस्तिथित नसल्याचे सांगितले , व महापालिकेने बसगाड्यांसाठी दिलेल्या अनुदानातुंच ह्या बसगाड्या घेणार असल्याचे सनगितले. तसेच समिती सदस्यांच्या मागणीनुसार एक किंवा दोन बसगाड्या घेणे शक्य नसल्याने हा संपूर्ण प्रस्तावच त्यांना दफ्तरी दाखल करावा लागला.