दादरमधील प्रथितयश शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2016

दादरमधील प्रथितयश शाळेत विद्यार्थिनीवर बलात्कार

JPN NEWS ( Voice Of Citizens ) http://jpnnews.in
मुंबई - दादरमधील एका प्रथितयश शाळेत समारंभाच्या वेळी नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना काल (ता. 8) सायंकाळी घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी या आरोपीला बलात्कार आणि अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराच्या (पोस्को) गुन्ह्यात अटक केली आहे. 


सोमनाथ यादव (वय 20) असे पोलिसांनी अटक केलेल्या या कॅन्टीन कर्मचाऱ्याचे नाव आहे. शाळेत समारंभ सुरू असताना पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला सोमनाथ यादवने बाजूला नेऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. या घटनेने प्रचंड भेदरलेली ही विद्यार्थिनी शाळेच्या प्रसाधनगृहात जावून लपली. कार्यक्रम संपल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने नातेवाइकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. कोणीतरी आल्याची चाहूल लागताच ती प्रसाधनगृहातून धावतच बाहेर आली. पालक व शिक्षकांनी चौकशी केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. या मुलीला वैद्यकीय चाचणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सोमनाथ यादव याला अटक केली. या घटनेनंतर दादर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पालकांतही घबराट पसरली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात बलात्काराचा तसेच पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad