मुंबई महापालिकेची छोटी कंत्राटे मराठी बेरोजगार इंजिनयरनाच दया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2016

मुंबई महापालिकेची छोटी कंत्राटे मराठी बेरोजगार इंजिनयरनाच दया

मनसे विरुद्ध गुजारती,मारवाड़ी संघर्ष पेटणार
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
गुरुवारी घाटकोपरच्या महापालिकेच्या एन विभागात कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेद्वारे दिली जाणारी प्रभागातील छोटी कंत्राटे गुजराती मारवाड्याना न देता स्थानिक सुशिक्षित मराठी भाषिक इंजिनियर्सना देण्यात यावीत अशी मागणी मनसेचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यामुले येणाऱ्या दिवसात मुंबईमधे मराठी विरुद्ध गुजारती असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

मुंबई महानगर पालिकेकडून ई कोटेशनच्या निविदा काढून कंत्राटदाराना कामे दिली जातात. अशी 5% राखीव कंत्राटे सुशिक्षित बेरोजगार इंजीनियरला देण्याचे महापालिकेने ठरवले होते. अशी कंत्राटे मिळवण्यासाठी मुंबईमधील गुजराती मारवाड़ी कंत्राटदारानी आपल्या नातेवाईकांच्या नावाने छोट्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. अश्या कंपन्याद्वारे स्थानिक बेरोजगारांना मिळणारी कामे गुजराती मारवाड़ी लाटत आहेत असा आरोप कदम यांनी केला आहे.

घाटकोपरच्या एन प्रभागात असाच प्रकार नरपथ देवरा या कंत्राटदाराने केला आहे. हा प्रकार आम्ही उघड केला असता या कंत्राटदाराचे चलन भरण्यासाठी शिवसेनेच्या विभागप्रमुख शाखाप्रमुख यांनी धावाधाव केली. शिवसेना एकीकडे मराठी भाषिकांचा पुळका असल्याचे दाखवत असताना वास्तवात मात्र शिवसेना गुजारती आणि मारवाड़ी कंत्राटदाराना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत शिवसेनेना मराठी भाषिक बेरोजगार इंजीनियरच्या पाठीशी का उभी राहत नाही असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे. येणाऱ्या काळात मराठी सुशिक्षित बेरोजगार इंजीनियरची युनियन बनवून कंत्राटे मिळण्यासाठी सहकार्य कारणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

Post Bottom Ad