त्या दक्ष नागरिक संघटनेच्या सदस्यांचा कॉंग्रेस करणार सत्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2016

त्या दक्ष नागरिक संघटनेच्या सदस्यांचा कॉंग्रेस करणार सत्कार

डोंबिवली / सारिखा शिंदे :-  JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
पोलिसांना  मदतीचा  हात म्हणून  दक्ष नागरिक संघटना स्थापन झाली. पोलिसांबरोबर डोंबिवलीत रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे काम हि संघटना करीत आहे. ह्या संघटनेचे  दोन सदस्य आणि तीन पोलिसांमुळे चोरी टळली. कॉंग्रेसने याची दाखल घेतली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात कॉंग्रेस पदाधिकारी त्याचा सत्कार करणार आहेत.  


कोपर रोड परिसरात राहणारे तेंडुलवर आणि तानाजी बुद्रुक हे  दक्ष नागरी संघाचे सदस्य सोमवारी रात्रीच्या वेळी विष्णूनगर पोलिसांबरोबर  गस्त घालीत असतात. रात्री दीड वाजता डोंबिवली पश्चिमेकडील बावन् चाळीत पोलीसांची गस्त चालू असताना तेथील एका बिल्डिंगच्या तळ मजल्यावर एक चोर तोंडाला रुमाल बांधून जाताना दिसला.तो इसम चोरटा  असल्याचे निदर्शनात आल्यावर  पोलीस आणि दक्ष नागरिकांच्या टीमने  त्याचा पाठलाग  केला. काही वेळ त्या चोरट्याचा  पाठलाग  सुरु होता. मात्र तो चोर पळून जाण्यास यशस्वी ठरला. पोलीस आणि  आणि दक्ष नागरी संघाच्या दोन सदस्यांचे नागरिक कौतुक करीत आहे. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केणे , डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटी बी ब्लॉक  युवा अध्यक्ष प्रणव केणे आणि राहुल केणे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्या विष्णूनगर प्लोस ठाण्यात वपोनी इंद्रजीत कार्ले यांच्या उपस्थित त्या तीन पोलिसांचा आणि दक्ष नागरिक संघाचे सदस्य तेंडूलकर आणि तानाजी बुद्रुक यांचा सत्कार करणार आहेत.

Post Bottom Ad