" बाळासाहेबांच्या नावाला आक्षेप नाही, मात्र जुन्याच योजना नव्याने आणून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न दुर्दैवी ' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2016

" बाळासाहेबांच्या नावाला आक्षेप नाही, मात्र जुन्याच योजना नव्याने आणून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न दुर्दैवी '

माजी परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांचे वक्तव्य
मुंबई / www.jpnnews.in
सरकारी योजनेला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यात काही वावगे नाहीमात्र आघाडी सरकारच्या काळातील जुन्या योजनाच फक्त बाळासाहेबांचे नाव देऊन नव्याने आणल्या जात असतीलतर किमान त्याचे राजकीय श्रेय तरी घेऊ नकाअसा टोला माजी परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेला लगावला आहे. शनिवारी राज्याच्या परिवहन विभागातर्फे बाळासाहेबांच्या नावे एकदम सहा योजनांचे उदघाटन करण्यात आले. मात्र यापैकी बहुतांश योजना या आघाडी सरकारच्या काळातीलच असल्याचे सांगत फक्त "शिवनेरी'बसचे नाव "शिवशाहीकेले म्हणून परिवहन मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचेही ते म्हणाले. 


राज्याच्या परिवहन विभागाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सहा योजना सुरू करत असल्याची घोषणा केली. मात्र या योजना जुन्या असल्याचा दावा करत मा. अहिर यांनी यापैकी एकाही योजनेचे मंत्रिमंडळासमोर सादरीकरण झाले नसल्याकडे लक्ष वेधले आहे. एकिकडे राज्य परिवहन महामंडळ तोट्यात जात आहे. विद्यार्थी आणि इतर सामाजिक घटकांना जाहीर केलेल्या सवलती मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. अशा महामंडळाचा कारभार सुधारण्याऐवजी मंत्रीमहोदय जर जुन्याच योजनांना नव्याने सादर करण्यात मश्गुल असतील तर हे राज्याचे दुर्दैव आहे. या ‌शिवाय कोणत्याही सरकारी योजनेच्या नावात एखाद्या पक्षाचे नाव असणे हे बेकायदेशीर असून त्याविरोधात कुणी न्यायालयात गेल्यास योजनाच गंुडाळायची नामुष्की सरकारवर येऊ शकते याकडेही अहिर लक्ष वेधले आहे. एकूणच हा सगळा कारभार राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप करत अहिर यांनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधले. ते म्हणालेमुंबई सेंट्रल येथे झालेल्या या कार्यक्रमामुळे तब्बल अर्धा दिवस हा डेपो सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होता आणि या कालावधीत मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या सर्व गाड्या परळ आणि दादर येथून सोडण्यात आल्याने प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला. या शिवाय या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्ती "भगव्याटोप्या घालायला लावण्यामागचा राजकीय हेतू नेमका काय होता याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावाअसे आवाहनही त्यांनी केले. 
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले मंत्रिमंडळातील हेवेदावे
"
या सरकारचा रिमोट माझ्या हाती आहे हे शिवसेनेच्या मंत्र्यांनी लक्षात घ्यावेअसे वक्तव्य या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केले असे सांगत मा. अहिर म्हणाले कीमुख्यमंत्री महोदयांचे हे वक्तव्य म्हणजे मंत्रिमंडळात सर्व काही आलबेल नसल्याचेच द्योतक आहे. तसेच त्यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे दिलेली ही समजच असल्याचे ते म्हणाले. 

Post Bottom Ad