वांद्रे पश्चिम परिसरातील नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2016

वांद्रे पश्चिम परिसरातील नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू

मुंबई / JPN NEWS.in 
बृहन्मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील राहुल नगर परिसरात असणा-या नाल्यातील अतिक्रमणांमुळे गेल्या पावसाळ्यात अलियावर जंग मार्गकृष्ण चंद्र मार्गलिलावती रुग्णालय आदी परिसरांमध्ये पाणी साचल्याचे लक्षात आले होतेहि बाब लक्षात घेऊन ह्या नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही महापालिकेद्वारे सुरु करण्यात आली आहेमुंबई पोलीसांच्या सहकार्याने सुरु असलेल्या या कार्यवाही दरम्यान आतापर्यंत सुमारे ७० अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.


वांद्रे (पश्चिमभागातील राहुल नगर परिसरातील हा नाला 'राहुल नगर नालाया नावानेच ओळखला जातो.म्हाडाच्या भूभागातून काही अंतर जाणा-या या नाल्यामध्ये गेल्या काही वर्षात १२५ अनाधिकृत बांधकामे उभी राहिली होतीया बांधकामांमुळे व अतिक्रमित स्वरुपाच्या 'काँक्रीटायझेशनमुळे नाल्याच्या प्रवाहास अडथळा होऊन पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याचे लक्षात आले होतेत्यामुळे हि अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही महापालिकेद्वारे हाती घेण्यात आली आहेहि कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुंबई पोलीसांनी तत्परतेने सकारात्मक सहकार्य केले आहेया सर्व कार्यवाहीचे समन्वयन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंता राजेश यादवदुय्यम अभियंता (Sub Engineer) दिनेश भोसलेकनिष्ठ अभियंता अमित पोवारविक्रांत मणियार व सुशांत बागल हे करीत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad