मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
मुंबई महानगरपालिकेने मोकळे भूखंड लाटणाऱ्या संस्था आणि लोकांवर कारवाईसाठी यादी बनवली आहे. महापालिकेने बनवलेली यादीच चुकीची असल्याचा आरोप करत अशी चुकीची यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.
मुंबई महानगर पालिकेने मोकळे भूखंड धारकांची यादी बनवली आहे. या यादीमध्ये पालिकेच्या सभागृह नेत्या शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांच्या शैक्षणिक संस्थेला भूखंड देण्यात नोंद आहे. विश्वासराव यांनी भूखंडाची मागणी केली असली तरी त्यांना भूखंड मिळालेला नाही. तरीही त्यांचे नाव या यादीमध्ये टाकण्यात आले आहे. विश्वासराव यांचे नाव या यादीमध्ये टाकल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेवून याचा निषेध करत चौकशीची मागणी केली आहे. हा प्रकार म्हणजे राजकीय भविष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही विश्वासराव यांनी केला आहे. नेमका हाच मुद्दा मनसेचे संदिप देशपांडे यांनी स्थायी समिती मध्ये उपस्थित केला आहे. महानगरपालिकेने भूखंडधारकांची यादी बनवताना तृष्णा विश्वासराव यांच्या सारख्या भूखंड नसणाऱ्यांचे नाव समाविष्ट केले आहे. महानगरपालिकेने ज्यांना भूखंड दिले नाहीत त्यांची नावे यादी मध्ये समाविष्ठ केली आहेत. मग ज्यांना खरोखर भूखंड दिले आहेत त्यांची नावे कुठे गेली. हि नावे का प्रसिद्ध करण्यात आली नाहीत.असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेने ज्यांना भूखंड दिले आहेत त्यांची नावे या यादीमध्ये समाविष्ट केली नसल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी तृष्णा विश्वासराव यांना हे बदनाम करण्याचे षड्यंत्र असू शकते. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि यामागे कोणत्या विरोधी कि सत्ताधारी पक्षाचे कारस्थान आहे हे समोर आणावे अशी मागणी केली आहे. यावेळी डॉ. अनुराधा पेडणेकर, किशोरी पेडणेकर, मनोज कोटक इत्यादी सदस्यांनी सहभाग घेत या प्रकरणाचा निषेध नोंदवला आणि कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान संदिप देशपांडे यांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.