मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in रुग्णांना औषधांविषयी इत्थंभूत माहिती कळावी यासाठी राज्यातील पहिले ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ केईएम रुग्णालयात सुरू होणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
एखादे औषध किसे व किती वेळा घ्यायचे, ते डॉक्टर एकदा सांगतो. काही वेळा रुग्णांच्या सर्वच शंकांचे निरसन होत नाही. हे औषध नेमके कशासाठी दिले आहे? या औषधात कोणते घटक आहेत? औषधाची किती रिअॅक्शन येऊ शकते? या औषधाचा फायदा कसा होणार? अशा प्रश्नांची उत्तरे देणे डॉक्टरांना शक्य नसते. त्यासाठीच ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ २० जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आणि केईएम रुग्णालय मिळून हे केंद्र सुरू करणार असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.