दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुंबई ला घेऊन येणार आणि "मेक इन इंडिया'चा पंचतारांकीत थाट दखवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2016

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुंबई ला घेऊन येणार आणि "मेक इन इंडिया'चा पंचतारांकीत थाट दखवणार

असंवेदनशील सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस करणार अनोख्या पद्धतीने निषेध
मुंबई / www.jpnnews.in
राज्यातील पंधरा हजार गावांमध्ये दुष्काळ जाहिर झालेला असतानाआणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असताना त्यांना मदत करण्याऐवजी "मेक इन इंडियासारखे भपकेबाज आणि खर्चिक पंचतारांकीत कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची क्रुर थट्‌टा असल्याची टीका माजी उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांना सरकारी उधळपट्‌टीचे दर्शन घडवण्यासाठी "मेक इन इंडियाया कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील बीकेसी संकुलात मेक इन इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे.


राज्याच्या बहुतांश भागातील सर्वसामान्य माणसाला दुष्काळाच्या झळा साेसाव्या लागत असतानाचइथे मुंबईत मात्र विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सरकारी खर्चाने पंचतारांकीत सोहळे आयोजित केले जात असल्याबद्दल अहिर यांनी संताप व्यक्त केला. मेक इन इंडियाच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत इस्त्राइलडावोसजपानलंडन यासह अनेक देशात दौरे केले. या दौऱ्याच्या माध्यमातून नेमकी किती परदेशी गुंतवणुक आली हा खरोखरच संशोधनाचा प्रश्न आहे. ही वस्तुस्थिती माहित असतानाही परदेशी गुंतवणुकदारांना आकृष्ट करण्यासाठी पुढच्या महिन्यात अशाच एका आलिशान सोहळ्याचा घाट सरकारने घातला आहे. या सोहळ्यांतर्गत बीकेसीमध्ये तब्बल एक लाख चौरस मीटर क्षेत्रावर तसेच दहा वातानुकुलीत शामियान्यांमधून म्हणे परदेशी गुंतवणुकीसाठी चर्चा झडणार आहेत. असे सोहळे एरव्ही आयोजित करण्यात काही गैर नाही. पण जेव्हा राज्य दुष्काळाच्या भीषण संकटातून जात आहेअशा वेळी राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याला सरकारने प्राधान्य देण्याची गरज यावेळी अहिर यांनी व्यक्त केली. एकिकडे निधीअभावी शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार टाळाटाळ करत आहे. तांत्रिक कारणे देत कापूस उत्पादक शेतकऱ्याला तुटपुंजी मदतसुद्धा नाकारली जात असल्याकडे लक्ष वेधत अहिर यांनी मेक इन इंडियासारख्या कार्यक्रमांसाठीचा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी केली आहे. तसेच आपल्याला मदत करण्याऐवजी सरकार नेमके काय करत आहे. आणि जनतेच्या पैशाची कशी नाहक उधळपट्‌टी सुरू आहेहे दाखवण्यासाठी आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागातील काही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुंबईत घेऊन येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या निमित्ताने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला तरी या बेगडी सरकारच्या तथाकथित "मेक इन इंडिया'चे दर्शन होईलअसेही अहिर म्हणाले.

Post Bottom Ad