शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात पाच हजारांची वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2016

शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात पाच हजारांची वाढ

मुंबई / JPN NEWS.in  शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात पाच हजार रूपयांची वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे दोन हजार 721 निवासी डॉक्टरांना ऑगस्ट 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत वैद्यकीय आणि आयुर्वेद महाविद्यालयात पदव्युत्तर आणि विशेषोपचार अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी शिक्षणासोबतच संलग्नित शासकीय रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर म्हणून सेवा देतात. या सेवेचा मोबदला म्हणून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्यासंबंधीचा आढावा दर तीन वर्षांनी घेण्यात येतो. त्यानुसार 1 जुलै 2009 आणि 1 जुलै 2012 मध्ये विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ निवासी दोन हजार 191, वरिष्ठ निवासी 87, शासकीय दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे 195 आणि आयुर्वेद महाविद्यालयातील कनिष्ठ निवासी 248 अशा एकूण दोन हजार 821 विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनापोटी 140 कोटी 96 लाख रूपये इतका खर्च येतो, प्रत्येकी पाच हजार रूपयांची वाढ केल्यामुळे 16 कोटी 32 लाख रूपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad