मुंबई / JPN NEWS.in वैद्यकीय उपचारांचा खर्च दिवसेंदिवस आवाक्याबाहेर चालला असल्याने बेस्ट उपक्रमाने महापालिकेच्या धर्तीवर वैद्यकीय गट विमा योजना आणण्याची तयारी सुरू केली़ त्यानुसार कामगार संघटनांबरोबर बैठकाही सुरू झाल्या़ मात्र ४४ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही योजना अद्यापही कागदावरच आहे़
बेस्टमध्ये विशेषत: वाहक आणि चालकांचा दररोज सर्वसामान्य लोकांशी संपर्क येत असतो़ धकाधकीच्या या जीवनात यापैकी अनेकांना विविध व्याधी जडतात़ मात्र हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, कर्करोग, बायपास अशा शस्त्रक्रियांचा खर्च आज लाखाच्या घरात आहे़ हा उपचार कर्मचाऱ्यांना परवडत नसल्याने वैद्यकीय विमा योजना सुरू करण्याचा ठराव पालिका महासभेपुढे गेल्या वर्षी मंजूर करण्यात आला़ त्यानुसार या ठरावावर बेस्ट प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली़ याबाबत मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा सुरू झाली़ गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दोन बैठका झाल्यानंतर प्रस्तावित वैद्यकीय विमा योजनेमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काही बदल सुचविले़ मात्र त्यानंतर अद्यापही या योजनेची गाडी पुढे सरकलेली नाही़
तपासणी आणि गट विमा योजना
- केंद्र शासन व मुंबई महापालिकेतील योजनेच्या धर्तीवर ही वैद्यकीय गट विमा योजना राबवणार
- बेस्ट उपक्रमामध्ये ४४ हजार कर्मचारी-कामगार कार्यरत
- सध्या वैयक्तिक ३० हजार आणि कुटुंबासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंत मदत मिळते
- वैद्यकीय भत्ता म्हणून दरमहा ५०० रुपये दिले जातात
- बस आगार व कार्यशाळा येथील दवाखान्यांमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा
- मुंबई सेंट्रल आगारामध्ये वैद्यकीय तपासणी केंद्रामध्ये काही विशिष्ट वैद्यकीय तपासण्या होतात
No comments:
Post a Comment