JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई - मुंबईच्या वांद्रे येथील बँन्डस्टँडच्या समुद्रकिनाऱयावर सेल्फी घेत असता एक तरूण व तरूणीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी अकरा सुमारास घडली आहे. रमेश व तरन्नुम असे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहे. घटना अशी आहे की, तरन्नुम, नाझिया व कस्तुरी या तिघी मैत्रिणी असून, समुद्र किनाऱयावर सेल्फी काढण्यासाठी घेल्या होत्या.

सेल्फी काढताना तिघीचा तोल जाऊन समुद्रात पडल्या. हे दृश्य पाहुन जवळच असलेल्या रमेश या तरूणाने पाण्यात उडी मारली. आपल्या प्राणाची पर्वा न करता त्याने नाझिया व कस्तुरीला वाचविले. मात्र, तन्नुरला वाचविण्यात रमेशला यश आले नाही. यातच तिचे व रमेशचेही प्राण गेले. नेव्हीचे गार्ड व अग्निशमन दलाचे जवान हे शोध घेत असताना, त्यांना तन्नुरचे मृतदेह मिळाले असून, रमेशचे मृतदेह अद्याप सापडलेले नाही. काही प्रत्यक्षदर्शि म्हणाले, रमेश तरूणींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण तन्नुरला वाचविताना रमेश समुद्रात खेचला गेला. बुडताना त्याचे डोके दिसले होते. अद्याप पोलीस रमेशचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment