मुंबईतील झोपडीधारकांना अच्छे दिन - एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कर भरावा लागणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2016

मुंबईतील झोपडीधारकांना अच्छे दिन - एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कर भरावा लागणार

JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in मुंबई - मुंबईतील झोपडीधारकांना लवकरच अच्छे दिन दाखवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे . झोपड्यांना येत्या एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कर भरावा लागणार आहे. निवासी झोपड्यांना वार्षिक 2400 ते 9450 पर्यंत; तर व्यावसायिक वापराच्या झोपड्यांना 4800 ते 31 हजार 500 रुपयांपर्यंत मालमत्ता कर भरावा लागणार आहे. अहमदाबादच्या धर्तीवर लागू होणाऱ्या या करासाठी महापालिका अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व झोपड्यांचे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. 


मुंबई महापालिका मुंबईमधील झोपडपट्टीतून "सेवा करा‘अंतर्गत निवासी झोपडीसाठी 100 आणि अनिवासी झोपडीसाठी 250 रुपये कर वसूल करत होती. 2007 पासून सेवाकर वसूल करणे बंद करण्यात आले. त्यानंतर झोपड्यांना मालमत्ता कर लागू करावा म्हणून अर्थतज्ज्ञ प्रा. अभय पेठे यांच्यावर सल्लागार पदाची जबाबदारी सोपवत गेल्या वर्षी समिती नियुक्त केली. या समितीने झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याची शिफारस केली आहे. मालमत्ता कर रेडिरेकनरनुसार न लावता अहमदाबादच्या धर्तीवर ठराविक रक्कम ठरवून झोपडीचे क्षेत्रफळ आणि वापरानुसार दर निश्‍चित करण्याचे सुचविण्यात आले आहे. तळ मजल्यापेक्षा पहिल्या मजल्यावरील झोपडपट्टीला मालकत्ता कर कमी ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विधी समितीने प्रशासनाला सादर केला आहे. झोपड्यांना क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर लागू करण्यासाठी पालिका सर्व झोपड्यांचे 11 पातळ्यांवर सर्वेक्षण करणार आहे.

भांडवली पद्धतीने म्हणजे जागेच्या किमतीनुसार मुंबईत मालमत्ता कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे झोपड्यांनाही मालमत्ता कर लागू करावा लागणार आहे. जवाहरलाल नेहरू नागरिक पुनरुत्थान अभियानाच्या (जेएनएनआरयूएम) अंतर्गत झालेल्या करारानुसार शहरातील 100 टक्के मालमत्तांना कर लावावा लागणार. देशात वस्तू सेवा कर लागू झाल्यावर जकातीला पर्याय म्हणून झोपड्यांना मालमत्ता कर लागू करून त्यातून कमी होणारे उत्पन्न मिळता येऊ शकते.

कर 
निवासी झोपड्यांसाठी (वार्षिक) (रुपयांमध्ये)
क्षेत्रफळ (चौरस फूट) तळ मजला वरील प्रत्येक मजल्यासाठी 

125         2400  1800
125 ते 250  3600   2700
250 वरील    5400   4050

व्यावसायिक वापरासाठी (वार्षिक) (रुपयांमध्ये)
क्षेत्रफळ (चौरस फूट) तळ मजला वरील प्रत्येक मजल्यासाठी 

125              4800   3600
125 ते 250       7200   5400
250 ते 500      10,800  8100
500 ते 1000     14,400 10,800
1000 वरील      18,000  13,500 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad