तिकीट तपासनीसाला मारहाण करून रेल्वेच्या डब्यातून फेकण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2016

तिकीट तपासनीसाला मारहाण करून रेल्वेच्या डब्यातून फेकण्याचा प्रयत्न

JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई - मध्य रेल्वेच्या अपंगांच्या डब्यातून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या टोळक्‍यावर कारवाई करत असताना त्यातील एक जण खाली पडला. त्यामुळे या टोळक्‍याने चंद्रशेखर नाईक या तिकीट तपासनीसाला मारहाण करून त्याला गाडीतून फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी कुर्ला आणि दादर स्थानका दरम्यान घडली. 

नाईक कुर्ला स्थानकात जलद गाडीच्या प्रथम दर्जाच्या डब्यात तिकीट तपासणीसाठी जात असताना शेजारच्या डब्यातील अपंगांनी त्यांना अपंगांच्या डब्यात तपासणी करण्यास सांगितले. त्यामुळे ते त्या डब्यात गेले. अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या टोळक्‍याला त्यांनी बाजूला उभे करून दंड भरण्यासाठी दादर स्थानकात उतरण्यास सांगितले. त्या वेळी दरवाजात उभा असलेला या टोळक्‍यातील विनोद वैष्णव (वय 20) हात सुटल्यामुळे शीव व माटुंगादरम्यान खाली पडला. तो तिकीट तपासनीसामुळे पडल्याचा आरोप करून या टोळक्‍याने नाईक यांना मारहाण केली व बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या विनोदला रुग्णालयात दाखल केले आहे. हात सुटल्यामुळे खाली पडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad