पालिका शाळेतील विद्यार्थिनी ममता पवार राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2016

पालिका शाळेतील विद्यार्थिनी ममता पवार राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

मुंबई / JPN NEWS.in / 2 Jan 2016
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत भारत स्काऊट आणि गाईडस्ची विद्यार्थिनी कुमारी ममता संतोष पवार हिला भारत स्काऊट आणि गाईड राष्ट्रीय कार्यालय, दिल्ली येथे राष्ट्रपती पुरस्काराने माननीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.


कुमारी ममता संतोष पवार ही महानगरपालिकेच्या गोशाळा मार्ग, महापालिका मराठी शाळा क्रमांक २ मुलुंडची विद्यार्थिनी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणारी सर्वप्रथम वीरबाला असून ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत होती. कॅप्टन स्मिता पाटील यांनी कुमारी ममता पवार हिचे गाईड म्हणून काम पाहिले आहे. कुमारी ममता पवार हिच्या गौरवशाली यशाबद्दल मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर अलका केरकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी कौतुक केले आहे.
Displaying 02-January-16.jpgDisplaying 02-January-16.jpg
Displaying 02-January-16.jpg

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad