JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in मुंबई - हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खान विराेधात गुन्हा नोंदवताना आपल्याकडून चुका झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्या वेळी ज्या चुका झाल्या त्या भविष्यात टाळाव्यात यासाठी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले असून यात तब्बल १६ सूचना देण्यात आल्या आहेत. सन २००२ च्या या खटल्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना केलेल्या चुका आणि तपासातील त्रुटींवर बोट ठेवत उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली हाेती.
हिट अँड रन खटल्यात सत्र न्यायालयाने सलमानला दाेषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा ठाेठावली हाेती. मात्र हे अाराेप पाेलिसांना उच्च न्यायालयात सिद्ध करता अाले नाहीत, त्यामुळे सलमान निर्दाेष सुटू शकला. त्या वेळी उच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे पोलिसांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहेत. सलमान खान प्रकरणात झालेल्या चुका भविष्यात होऊ नयेत, यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस अायुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांच्या सहीचे एक परिपत्रक मुंबईील सर्व पोलिस ठाण्यांना पाठवले आहे. अशा पद्धतीची केस हाताळताना त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खुद्द तपास अधिकाऱ्याने दक्षता घेण्याच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत.
जातमुचलक्याची रक्कम भरण्यास काेर्टाकडून १५ दिवसांची मुदत
मुंबई | हिट अँड रन प्रकरणात उच्च न्यायालयाने १० डिसेंबर राेजी सलमान खानची २५ हजार रुपयांच्या दाेन जातमुचलक्यांवर सुटका केली हाेती. दाेन अाठवड्यांत ही रक्कम भरण्याचे अादेश न्यायालयाने दिले हाेते. मात्र सलमानच्या वतीने साेमवारी उच्च न्यायालयात अर्ज करून ही रक्कम भरण्यास अाणखी मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली हाेती. त्यानुसार न्यायालयाने त्याला अाणखी दाेन अाठवड्यांची मुदत वाढवून दिली अाहे.

काय झाल्या होत्या त्रुटी?
- सलमान खानने दारू प्यायली होती याच्या पुराव्यादाखल न्यायालयाला सादर केलेल्या पुराव्यांमध्ये पुरावा कायद्याच्या नियम ६५ ब अंतर्गत प्रमाणीकरण न करताच पोलिसांनी सांताक्रुझच्या रेन बारचे बिल जोडले होते.
- रेन बारच्या बिलावर हे बिल आपल्याच बारचे असल्याचे मान्य करणारा हस्तलिखित स्वरूपातील मजकूर आहे. मात्र, ही मान्यता कुणी दिली त्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव नाही.
- जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलचे बिल आणि पार्किंगसाठीच्या चिठ्ठीचा पुराव्यांमध्ये समावेश केला गेला होता. मात्र त्याचा उल्लेख घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यामध्ये नव्हता.
- अपघात झाला त्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २००२ रोजी सलमान सकाळपासून वांद्रे पोलिस ठाण्यात हजर असतानाही रक्ताची तपासणी दुपारी करण्यात आली.
- या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नुरुल्ला शेखच्या रक्ताचे नमुने भाभा रुग्णालयात घेतले मग सलमानला रक्ततपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात का नेण्यात आले?
- जे.जे. रुग्णालयाने सलमानच्या रक्ताचे नमुने २८ सप्टेंबरलाच पोलिसांकडे सुपूर्द केलेले असतानाही ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे ३० सप्टेंबर रोजी पाठवण्यात आले. हा दोन दिवसांचा वेळ का लागला?
- सलमानच्या रक्ताच्या नमुन्यांचा ताबा कोणत्या वेळी कोणाकडे होता, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने रक्त तपासणीचा अहवाल ग्राह्य मानता येत नाही.
- आरोपीच्या रक्ताचे नमुने ज्या पोलिस शिपायाने रुग्णालयातून आणले, त्याबाबत कोणतीही नोंद आढळत नाही.
- महत्त्वाची त्रुटी - सलमानच्या शरीरातून सहा मिली रक्त काढण्यात आल्याची नोंद रुग्णालयात आहे. मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चार मिली रक्तच तपासणीसाठी सुपूर्द करण्यात आले.
- न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हे नमुने कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात आले त्याची नोंद नाही.
- वैद्यकीय पुरावे गोळा करताना तपास अधिकाऱ्याने त्याची नीटपणे पडताळणी केली नाही. कारण रक्ताच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालातच काही त्रुटी नमूद करण्यात आल्या आहेत.
- या प्रकरणी मुंबई प्रतिबंधक कायदा कलम ६६ (१) (ब) गुन्हा नोंदवताना लावणे आवश्यक असतानाही ते लावण्यात आले नाही.
- दोन ठिकाणी एफआयआरमध्ये फेरबदल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असतानाही त्यावर समाधानकारक उत्तरे नाहीत.
- सलमानच गाडी चालवत होता किंवा नाही याबाबतचे जबाब नोंदवताना योग्य नियमांचे पालन झाले नाही.
- अपघात टायर फुटल्याने झाल्याचा दावा सरकारी पक्षाद्वारे करण्यात आला होता, मात्र या दाव्याच्या पुष्टीसाठी टायरची तपासणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून करणे गरजेचे होते.
- या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी कमाल खानची साक्ष महत्त्वाची असताना, तसेच त्याचा पत्ता पोलिसांकडे असतानाही त्याची साक्ष नोंदवण्यात आली नाही.

No comments:
Post a Comment