हैद्राबाद िवद्यापीठातील दलित िवद्यार्थी रोहीथ वेमुला याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईतील आंबेडकरी अनुयायांनी गुरुवारी सांयकाळी उत्स्फुर्तपणे सीएसटीसमोर मूक निदर्शने केली. आझाद मैदानपानापासून सुरु झालेली रांग मेट्रो थिएटरपर्यंत गेली होती. अखिल भारतीय िवद्यार्थी परिषद, हैद्राबाद िवद्यापीठाचे कुलगुरु, केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय आिण मनुष्यबळ िवकास मंत्री स्मृती इराणी यांच्या िनषेधाचे फलक पथपथावर शांतपणे उभे राहून िनषेध करणाऱ्या या युवकांनी हाती घेतले होते.
१७ जानेवारी रोजी रोहिथ याने हैद्राबाद िवद्यापीठात आत्महत्या केली. त्याच्या दुसऱ्याच िदवशी मुंबईत या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस, एनसीपी, डावे पक्ष, रिपाइं, भारिप आिण िवद्यार्थी संघटनांनी या घटनेचा निषेध म्हणून निदर्शने केली. दोन िदवसापूर्वी मुंबईतील तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सोशल िमडीयावर ह्यरोहीथ वेमुला जस्टीस फोरमह्णची स्थापना केली होती. तसेच गुरुवारी सायंकाळी सीएसटीला जमण्याचे आवाहन सोशल माध्यमांव्दारे करण्यात आले होते.
फोरमच्या आवाहनला प्रतिसाद देत सीएसटीला आज हजारो युवक जमा झाले होते. त्यामध्ये तरुणींची मोठी संख्या होती. शेकडो तरुण, तरुणींच्या हाती पोस्टर्स होते. त्यावर ह्यअभाविपवर बंदी घालाह्ण, ह्यरोहीथला न्याय द्याह्ण, ह्यआम्ही पाचपेक्षा अिधक आहोतह्ण, ह्यरोहीथ तेरे बलीदानसे बनेंगे, आंबेडकर हर मकानसेह्ण अशा घोषणा लिहिलेले हिंदी, मराठी आिण इंग्रजीतील पोस्टर्स लक्ष वेधून घेत होती.