काँग्रेस, डावे आिण िरपब्लीकन कार्यकर्ते रस्त्यावर
मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
हैद्राबाद िवद्यापीठातील संशोधक दलित िवद्यार्थी रोहीत येमुला याच्या आत्महत्येच्या घटनेचे पडसाद मुंबईत बुधवारी आणखी तीव्र झाले. रिपब्लीकन सेना, काँग्रेस पक्ष, डाव्या संघटना आणि भारिप बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील दादर, सीएसटी, चर्चगेट अशा वर्दळीच्या ठीकाणी जोरदार िनदर्शने करत नरेंद्र मोदी सरकार, अखिल भारतीय िवद्यार्थी परिषद आिण भारतीय जनता पक्षाचा तीव्र शब्दात धिक्कार केला.
भारिप बहुजन महासंघाचे सचिव ज. वि. पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेटला आंदोलन झाले. या आंदोलनात दोनशेपेक्षा अिधक कार्यकर्त्यांनी भाग घेतला. चर्चगेटची वाहतूक खोळंबू नये म्हणून इरॉस सिनेमागृहासमोर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
आनंदराज आंबेडकर यांच्या िरपब्लिन सेनेच्या वतीने सकाळी सीएसटीजवळील आझाद मैदानात रोहीत येमुलाच्या आत्महत्या घटनेचा तीव्र िनषेध करण्यात आला. सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
दादरला स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया, डेमोक्रेटीक युथ फेडरेशन आॅफ इंडिया, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आिण जातीअंत संघर्ष समितीने निषेध आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आयदान या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका उर्मिला पवार यांनी केले.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर आज काँग्रेसला जाग आली. युथ काँग्रेसच्या वतीने आझाद मैदान येथे निषेध आंदोलन झाले. तसेच काँग्रेसच्या अनुसूचित जाती िवभागाच्या वतीने दादरला आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी भाग घेतला.
सीबीआय चौकशी करा
िरपाइं अध्यक्ष आिण खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी हैद्राबाद येथे जावून रोहीत येमुला याच्या कुटुंबियांची भेट घेतली. आत्तापर्यंत हैद्राबाद विद्यापीठात ९ दलित िवद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून येमुलाच्या आत्महत्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी. येमुलाच्या कुटुंबियांना २५ लाखाची मदत द्यावी आिण हैद्राबाद िवद्यापीठाचे कुलगुरु आप्पाराव यांना िनलंबीत करावे अशा मागण्या आठवले यांनी केल्या आहेत.
फोरमची स्थापना
मुंबईतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ह्यरोहीत येमुला जस्टीस फोरमह्णची अनौपचारीक स्थापन केला आहे. या फोरमच्या वतीने गुरुवारी (उद्या) सीएसटीला निदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे मुंबईत या प्रकरणी मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे.